गोर सेनेचे साखळी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:29 IST2021-01-22T04:29:26+5:302021-01-22T04:29:26+5:30
उस्मानाबाद : कृषी कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीत दीड महिन्यापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून गोर सेनेच्या वतीने बुधवारपासून ...

गोर सेनेचे साखळी उपोषण
उस्मानाबाद : कृषी कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीत दीड महिन्यापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून गोर सेनेच्या वतीने बुधवारपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिल्ली येथे कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून, या शेतकरी आंदोलनात अनेक शेतकरी शहीद झाले आहेत. या कायद्यासंदर्भात सरकारसोबत अनेक वेळा चर्चा, बैठका होऊनही अद्याप कुठलाच ठोस निर्णय झालेला नाही, तसेच या शेतकरी आंदोलनाला सरकारने, तसेच न्यायालयाने दाबण्याचा प्रयत्न केला आहे. या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण देशभरात गोर सेनेच्या वतीने ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरू करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी गोर सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गोर सेनेचे विभागीय अध्यक्ष राजाभाऊ पवार व जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा सहसचिव दिलीप आडे, मोहन राठोड, संजय चव्हाण, कालिदास चव्हाण, अविनाश राठोड, शहाजी चव्हाण, सचिन पवार, सचिन राठोड, दशरथ राठोड, पृथ्वीराज चव्हाण, बालाजी राठोड, अनिकेत राठोड, अजय चव्हाण, उमेश राठोड आदी सहभागी झाले आहेत.