उत्पादन शुल्कचा सोनारीत छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:33 IST2021-05-19T04:33:56+5:302021-05-19T04:33:56+5:30

उस्मानाबाद : परंडा तालुक्यातील सोनारी येथे देशी-विदेशी मद्याची विनापरवाना साठा करुन ठेवला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकास ...

Gold print of excise duty | उत्पादन शुल्कचा सोनारीत छापा

उत्पादन शुल्कचा सोनारीत छापा

उस्मानाबाद : परंडा तालुक्यातील सोनारी येथे देशी-विदेशी मद्याची विनापरवाना साठा करुन ठेवला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकास खबऱ्या मार्फत माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने १७ मे रोजी छापा टाकून ७ लाख ९२ हजार ३६६ रुपये किंमतीचा देशी-विदेशी मद्याचा साठा जप्त केला. या प्रकरणी शैलेश हांगे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

परंडा तालुक्यातील सोनारी येथे शैलेश हांगे यांच्या घरी देशी-विदेशी दारुचा साठा करुन ठेवल्याची असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागास खबऱ्यामार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने १७ मे रोजी शैलेश हांगे यांच्या घरावर छापा मारुन झाडाझडती घेतली. यावेळी १५ लिटर क्षमतेच्या ३ प्लॉस्टीक कॅनमध्ये विदेशी मद्य तयार करण्यासाठी लागणारे ४५ लिटर बनावट ब्लॅन्ड, १ हजार मिली क्षमतेच्या १०७ प्लॉस्टीक बॉटलमध्ये विदेशी मद्य तयार करण्यासाठी लागणारे बनावट ब्लेंन्ड आढळून आले. त्यासोबतच विदेशी मद्य रॉयल स्टँगच्या १८० मिली क्षमतेच्या एकूण ४८ बॉटल, विदेशी मद्य इंपिरीअल ब्लूच्या १८० मिली क्षमतेच्या एकूण ४८० बॉटल तसेच देशी दारु बाॅबी संत्राच्या १८० मिली क्षमतेच्या एकूण ३ हजार २६४ बाॅटल व देशी दारु देशी संत्राच्या १८० मिली क्षमतेच्या ५ हजार ३७६ बॉटल आढळून आल्या. पथकाने अशा ७ लाख ९२ हजार ३६६ रुपये किंमतीचे देशी- विदेशी मद्याचे २१८ बॉक्स जप्त करुन शैलेश हांगे याच्याविरुध्द गुन्हा नोंद केला. ही कारवाई

राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद निरीक्षक आर.एस. कोतवाल, भूम दुय्यम निरीक्षक दुय्यम निरीक्षक बी.टी ढोकरे, उस्मानाबाद दुय्यम निरीक्षक एस. काळे, दुय्यम निरीक्षक एस. के. शेटे, एस.आर. शिंदे, जवान एम.एस. गजधने, एल. ए. डोंबाळे, एम. पी. कंकाळ, आर. आर.गिरी, व्ही. आय. चव्हाण, ए. बी. बोंगाणे, वाहनचालक ए.एम. सोनकांबळे, ए. आर. शेख यांच्या पथकाने कारवाई केली.

Web Title: Gold print of excise duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.