शेळी चोरांना ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:34 IST2021-07-30T04:34:22+5:302021-07-30T04:34:22+5:30

मागच्या एक - दीड वर्षांपासून शेळ्या चोरीबाबत अनेक गुन्हे नळदुर्ग पोलीस ठाण्यात दाखल आहेत. हे चोरटे शेळ्या चोरून त्यांची ...

Goats chained to thieves | शेळी चोरांना ठोकल्या बेड्या

शेळी चोरांना ठोकल्या बेड्या

मागच्या एक - दीड वर्षांपासून शेळ्या चोरीबाबत अनेक गुन्हे नळदुर्ग पोलीस ठाण्यात दाखल आहेत. हे चोरटे शेळ्या चोरून त्यांची परस्पर विक्री करायचे किंवा शेळ्यांची ओळख पटू नये या करता खबरदारी घेत होते. त्यामुळे शेळी पालकांत दहशत तर पोलिसांपुढे चोर शोधण्याचे आव्हान होते. स्थानिक गुन्हे शाखेने गुरूवारी तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील बाळू वसंत सावंत व रावसाहेब शेषेराव कदम आणि हंगरगा (तूळ) येथील मोहम्मद शेख या तिघांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून ६६ हजार रूपये किंमतीच्या लहान-मोठ्या १३ शेळ्या-बोकड व रोख २३ हजार रुपये असा एकंदरीत ८९ हजार रूपयांचा मुद्देमालासह जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि एम. डी. निलंगेकर, उपनिरीक्षक भुजबळ, पोहेकाॅ शेळके, पोलीस नाईक लाव्हरे, पाटील, पोकॉ सावंत, ढगारे, कोळी, ठाकूर, आरसेवाड व चालक हवलदार कवडे, घुगे, गव्हाणे, माने यांनी ही कारवाई केली.

290721\1838-img-20210729-wa0050.jpg

शेळीचोर आरोपी व स्थागुअ विभागाचे पोलिस कर्मचारी

Web Title: Goats chained to thieves