ट्रकच्या काचा फाेडून बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:22 IST2021-06-17T04:22:31+5:302021-06-17T04:22:31+5:30

उमरगा : पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करून तिघांनी ट्रकच्या काचा फोडून एकास लाथाबुक्क्याने व दगडाने बेदम मारहाण केली. ही ...

The glass of the truck was smashed | ट्रकच्या काचा फाेडून बेदम मारहाण

ट्रकच्या काचा फाेडून बेदम मारहाण

उमरगा : पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करून तिघांनी ट्रकच्या काचा फोडून एकास लाथाबुक्क्याने व दगडाने बेदम मारहाण केली. ही घटना तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर अचलबेट फाटा येथे १३ जून राेजी घडली.

याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कलीम खय्यामोद्दीन मुल्ला (रा. नेलवाड, ता. निलंगा) हे १३ जून रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील (क्र. ६५) अचलबेट फाटा येथे थांबले हाेते. याचवेळी पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून गावातीलच सल्लाउद्दीन मुल्ला, अमिर मुल्ला, रुकुम मुल्ला या तिघांनी संगनमत करून मारहाण केली. यानंतर जिवे मारण्याची धमकीही दिली. एवढेच नाही तर ट्रकच्या काचा फाेडून आर्थिक नुकसान केले. याप्रकरणी कलीम मुल्ला यांनी वैद्यकीय उपचार सुरू असताना दिलेल्या लेखी तक्रारीवरून संबंधित तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

Web Title: The glass of the truck was smashed