संत रविदास मंदिरासाठी जागा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:21 IST2021-06-30T04:21:04+5:302021-06-30T04:21:04+5:30
कळंब : शहरामध्ये चर्मकार समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या संत रविदास महाराजांच्या मंदिरासाठी पालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी चर्मकार ...

संत रविदास मंदिरासाठी जागा द्या
कळंब : शहरामध्ये चर्मकार समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या संत रविदास महाराजांच्या मंदिरासाठी पालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी चर्मकार समाजाच्या शिष्टमंडळाने प्रभारी नगराध्यक्ष संजय मुंदडा यांच्याकडे केली.
शहरामध्ये बहुसंख्येने चर्मकार समाज वास्तव्यास आहे. मात्र, आजपर्यंत समाजाचे गुरू संत रविदास महाराज यांच्या मंदिरासाठी नगर परिषदेने जागा उपलब्ध केलेली नाही. त्यामुळे चर्मकार समाजाचे आराध्य दैवत श्री संत गुरू रविदास महाराज यांच्या मंदिरासाठी सार्वजनिक ठिकाणी सर्व सोयीयुक्त जागा नगर परिषदेने उपलब्ध करून द्यावी, या मागणीचे निवेदन राष्ट्रीय चर्मकार महासंघ युवक जिल्हाध्यक्ष विकास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी नगराध्यक्ष संजय मुंदडा यांना देण्यात आले. यावर सुहास कदम, वैजनाथ साबळे, रवी कदम, राजेंद्र शेवाळे, भिकचंद शेवाळे, पुष्पक तुपसमुद्रे, श्याम शिंदे, रमेश शिंदे, गोरख टाचतोडे, शिवाजी शिंदे, लिंबराज ठोंबरे, एस. टी. बेळगावकर, रंगनाथ कदम, प्रा. जालिंदर लोहकरे, बाबूराव पाखरे, बाबासाहेब कांबळे, श्रीहरी ताटे, मनोज कदम, सुधीर कदम, सोमनाथ वनकळस, दयानंद शिंदे, धनाजी भालेराव, सचिन साबळे यांच्यासह शहरातील चर्मकार समाजबांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
290621\img-20210628-wa0038.jpg
कळंबच्या प्रभारी नगराध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर चर्मकार समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी विकास कदम,सुहास कदम, वैजिनाथ साबळे, रवि कदम आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.