कोरोना लस मोफत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:00 IST2021-03-04T05:00:43+5:302021-03-04T05:00:43+5:30
कळंब : कोरोना महामारी लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा आता देशभर सुरू झालेला आहे. यामध्ये मोफत आणि विकत असे दोन ...

कोरोना लस मोफत द्या
कळंब : कोरोना महामारी लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा आता देशभर सुरू झालेला आहे. यामध्ये मोफत आणि विकत असे दोन पर्याय निवडले असून, यासाठी २५० रुपये किंमत ठरवलेली आहे. याला आयएमएचा विरोध असून, सर्वांना मोफत लस उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केंद्र शासनाकडे केली आहे.
शासनाने लस उपलब्ध करून दिल्यास आम्ही ती मोफत टोचून देण्यास तयार आहोत, असे आयएमएच्या मुख्यालयातून काढलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. तसेच देशभरातील सर्व साडेतीन लाख आयएमए सदस्य, त्यांच्या मालकीच्या दवाखान्यात, हॉस्पिटलमध्ये तसेच नर्सिंग होममध्ये सदरील लस मोफत देणार आहेत. ज्यामुळे सर्व भारतीयांना लसीकरणाचा लाभ घेता येईल, अशी माहिती आयएमएचे प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे यांनी दिली.