टीचर्स सोसायटीची सर्वसाधारण सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:32 IST2021-03-18T04:32:33+5:302021-03-18T04:32:33+5:30

यावेळी उपाध्यक्ष लक्ष्मण चव्हाण, माजी चेअरमन हनुमंत शिंदे, संचालक बशीर शेख, श्रीमंत जाधव, सचिव तुकाराम कुंभार, विजय ओवांडकर, ...

General meeting of the Teachers Society | टीचर्स सोसायटीची सर्वसाधारण सभा

टीचर्स सोसायटीची सर्वसाधारण सभा

यावेळी उपाध्यक्ष लक्ष्मण चव्हाण, माजी चेअरमन हनुमंत शिंदे, संचालक बशीर शेख, श्रीमंत जाधव, सचिव तुकाराम कुंभार, विजय ओवांडकर, बालाजी मसलगे उपस्थित होते. कोरोनाचे सर्व नियम पाळून ही सभा ऑनलाईन घेण्यात आली. यावेळी चेअरमन मोरे यांनी या संस्थेने कर्ज मर्यादा दहा लाख, तर व्याजाचा दर ११ टक्के केल्याचे सांगून यावर्षी सर्व सभासदांना ठेवीवर १० टक्के, तर शेअर्सवर ८ टक्के लाभांश देण्यात आल्याचे सांगितले. ठेवीवर ९ टक्के व्याज देण्यात येत असून, सभासदांना आवर्त ठेव योजनेत ९ टक्के व्याज दराने लाभ मिळत असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक हनुमंत शिंदे यांनी केले. तुकाराम कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. लक्ष्मण चव्हाण यांनी आभार मानले. संचालक बशीर शेख यांनी अहवाल वाचन केले.

Web Title: General meeting of the Teachers Society