काटीत रंगले नवोदित कवींचे संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:14 IST2021-02-05T08:14:30+5:302021-02-05T08:14:30+5:30

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील काटी येथे निसर्ग काव्य मंच समूहाच्या वतीने पंकज काटकर यांच्या संकल्पनेतून ‘आमची माती आमची माणसं’ ...

A gathering of budding poets | काटीत रंगले नवोदित कवींचे संमेलन

काटीत रंगले नवोदित कवींचे संमेलन

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील काटी येथे निसर्ग काव्य मंच समूहाच्या वतीने पंकज काटकर यांच्या संकल्पनेतून ‘आमची माती आमची माणसं’ हे कविसंमेलन बुधवारी सायंकाळी पार पडले. यात नवोदित कवींनी विविध विषयांवर कविता सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.

संमेलनाचे उदघाटन सरपंच आदेश कोळी, उपसरपंच सुजित हंगरगेकर, बाबूराव ढगे, मकरंद देशमुख, जितेंद्र गुंड, पोलीस अभिजित गाटे, उमाजी गायकवाड, कवियित्री आशाबी शेख, जयश्री घोडके, सादिक शेख, अहमद पठाण, करीम बेग, सुनील परीट आदी मान्यवरांच्या उपस्थितीत भाग्यश्री खुटाळे-कासार (फलटण) यांच्या हस्ते करण्यात आले. संमेलनाध्यक्षा म्हणून मराठी साहित्य मंडळ बोरोवली विभागाच्या विनीता कदम उपस्थित होत्या. त्यांनी ‘माझा शेतकरी राजा’ कवितेचे सादरीकरण केले. संमेलनात मुंबई, सोलापूर, बार्शी, फलटण, उस्मानाबाद, माढा आदी ठिकाणाहून एकूण ५० कवींनी सहभाग घेतला. यामध्ये दुसरीपर्यंत शिक्षण झालेले नवोदित कवी समीर कुरेशी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील ‘माझा राजा असा होता’ ही कविता सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. पोलीस कर्मचारी अभिजित गाटे यांनी ‘पोरी जरा जपून वाग...’ ही कविता सादर केली. युवराज जगताप यांनी ‘नशा नाद खुळा’ हा अभंग सादर केला.

याशिवाय कवी बालाजी पालमपल्ले, नितीन पाटील, आशाबी शेख, जयश्री घोडके, सादिक शेख, बापू काळे, सूरज अंगुले, अजित थोरात, सागर गरड, युसूफ सय्यद, दत्ता आनंदगावकर, शेखर ठोंबरे, माधव धेंडे, फुलचंद नागटिळक, संतोष चव्हाण, सुशांत क्षीरसागर, वडरे, रवीराज राठोड, प्रकाश हिरेमठ, गणेश लोंढे, शिवाजी गाडेकर, बालकवी क्षीरसागर‌ आदींनी कविता सादर केल्या. सूत्रसंचालन सहशिक्षक पंकज काटकर तर आभार अनिल हंगरकर यांनी मानले.

Web Title: A gathering of budding poets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.