भूममधील श्रेयच्या खेळाची देशपातळीवर झाली निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:21 IST2021-07-03T04:21:07+5:302021-07-03T04:21:07+5:30
भूम : केंद्र सरकारने आयोजित केलेल्या टाॅयकॅथाॅन २०२१ स्पर्धेमध्ये येथील रहिवासी श्रेयस सुनीलकुमार डुंगरवाल याच्या संघाने तयार केलेल्या खेळाची ...

भूममधील श्रेयच्या खेळाची देशपातळीवर झाली निवड
भूम : केंद्र सरकारने आयोजित केलेल्या टाॅयकॅथाॅन २०२१ स्पर्धेमध्ये येथील रहिवासी श्रेयस सुनीलकुमार डुंगरवाल याच्या संघाने तयार केलेल्या खेळाची देशातील टॉप-५० खेळांमध्ये निवड झाली असून, याबद्दल श्रेयसचे व त्याच्या संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जगात गेम्स खेळण्याच्या बाजारपेठेत भारताचे गेम्स कमी असल्याने केंद्र सरकारने टाॅयकॅथाॅन २०२१ गेम्स स्पर्धा आयोजित केली होती. यात १७ हजारांहून अधिक संघांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी फक्त १,५६७ संघांची स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. २४ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगल्या संकल्पना असलेल्या संघांसोबत ऑनलाइन चर्चासत्र आयोजित केले होते. यानंतर २६ जून रोजी अंतिम संघ देशपातळीवर निवडण्यात आले. यामध्ये पिंपरी-चिंचवड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग (पुणे) येथील ‘टीम आर्या’ यांची देशपातळीवर निवड झाली आहे. या संघात पलक गुप्ता, शार्वी घोगले व श्रेयस डुंगरवाल यांनी भाग घेतला. त्यांना प्रा. कपिल ताजने यांनी मार्गदर्शन केले.
010721\2526fb_img_1625146369663.jpg
श्रेयस डुगूंरवाल फोटो