बारमध्ये मांडला जुगार, ५ जण अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST2021-06-22T04:22:23+5:302021-06-22T04:22:23+5:30

भूम येथील सोनाली बार व रेस्टॉरंट येथे पत्त्याचा जुगार खेळला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या ...

Gambling in the bar, 5 people stuck | बारमध्ये मांडला जुगार, ५ जण अडकले

बारमध्ये मांडला जुगार, ५ जण अडकले

भूम येथील सोनाली बार व रेस्टॉरंट येथे पत्त्याचा जुगार खेळला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीची खात्री केल्यानंतर पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक पांडुरंग माने, कर्मचारी मरलापल्ले, शेळके, जाधवर, आरसेवाड, कावरे यांच्या पथकाने रविवारी या हॉटेलवर छापा टाकला तेव्हा आत आरोपी दीपक दत्तात्रय मुळे, सुदाम केरबा पौळ, मधुकर रामभाऊ सपकाळ, सूर्यकांत मच्छिंद्र गायकवाड, धोंडिराम सर्जेराव शेंडगे हे तीन पत्ती नावाचा जुगार खेळताना आढळले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडील २० हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, कारवाई होताच जागामालक राजेंद्र बाळासाहेब शाळू याने तेथून धूम ठोकली. याप्रकरणी भूम पोलिसांत सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Gambling in the bar, 5 people stuck