‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा उडाला फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:57 IST2021-03-13T04:57:53+5:302021-03-13T04:57:53+5:30
दाटीवाटीने बसले कर्मचारी-पंचायत समितीत आढावा बैठकतुळजापूर : एकीकडे कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे शासन, प्रशासनाची झाेप उडाली आहे. असे ...

‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा उडाला फज्जा
दाटीवाटीने बसले कर्मचारी-पंचायत समितीत आढावा बैठकतुळजापूर : एकीकडे कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे शासन, प्रशासनाची झाेप उडाली आहे. असे असतानाच फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवित तुळजापूर पंचायत समितीत विकास कामांच्या आढाव्यासाठीची बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी अक्षरश दाटीवाटीने बसल्याचे पहावयास मिळाले. विशेष म्हणजे, ही बैठ सीईओ डाॅ. विजयकुमार फड यांच्या उपस्थितीत झाली.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात काेराेनाचा संसर्ग वाढू लागला आहे. दिवसागणिक रूग्णांच्या संख्येत भर पडत आहे. हे संकट लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याची पायमल्ली करणार्यांविरूद्ध कारवाई करण्याचे आदेशही काढले आहेत. असे असतानाच दुसरीकडे खुद्द प्रशासनातील अधिकार्यांकडूनच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली झाली आहे. तुळजापूर पंचायत समितीच्या सभागृहात विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. ही बैठक सीईओ डाॅ. फड यांच्या उपस्थितीत झाली. याबैठकीत फिजिकल डिस्टन्सिंगचा अक्षरश फज्जा उडाल्याचे पहावयास मिळलाे. विविध विभागाचे कर्मचारी दाटीवाटीने खुर्च्यात बसले हाेते. एवढेच नाही तर बैठकीतील अनेक अधिकारी, कर्मचारी मास्कविना दिसून आले, हे विशेष.