भांडगावात चाेरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:31 IST2021-05-17T04:31:30+5:302021-05-17T04:31:30+5:30

उस्मानाबाद -परंडा तालुक्यातील भांडगाव येथे १५ मेच्या रात्री चाेरट्यांनी धुमाकूळ घालत किरणा दुकानासह दाेन घरे फाेडली. यात दागिन्यांसह राेकड ...

A frenzy of charities in Bhandgaon | भांडगावात चाेरट्यांचा धुमाकूळ

भांडगावात चाेरट्यांचा धुमाकूळ

उस्मानाबाद -परंडा तालुक्यातील भांडगाव येथे १५ मेच्या रात्री चाेरट्यांनी धुमाकूळ घालत किरणा दुकानासह दाेन घरे फाेडली. यात दागिन्यांसह राेकड लंपास केली. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध परंडा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, भांडगाव येथील अविनाश जालिंधर धस यांचे गावातच किराणा दुकान आहे. अज्ञात चाेरट्यांनी १५ मेच्या रात्री दुकानाचे शटर उचकटून आतील राेख ७ हजार रूपये लंपास केले. यानंतर चाेरट्यांनी अविदा काेळेकर व साधू जाधव यांच्या घराकडे माेर्चा वळविला. दाेन्ही घरांच्या दरवाजावरील कुलूप ताेडून आतील २६ ग्रॅम वजनाचे साेन्याचे दागिने चाेरून नेले. चाेरीची ही घटना समाेर आल्यानंतर अविनाश धस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चाेरट्यांविरूद्ध परंडा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

Web Title: A frenzy of charities in Bhandgaon