मोफत बिनटाका शस्त्रक्रिया शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:32 IST2021-01-20T04:32:10+5:302021-01-20T04:32:10+5:30

काळनिंबाळा येथे काँग्रेसचे वर्चस्व बलसूर : उमरगा तालुक्यातील काळनिंबाळा येथील नऊ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एका जागेवर राष्ट्रवादी ...

Free Bintaka Surgery Camp | मोफत बिनटाका शस्त्रक्रिया शिबिर

मोफत बिनटाका शस्त्रक्रिया शिबिर

काळनिंबाळा येथे काँग्रेसचे वर्चस्व

बलसूर : उमरगा तालुक्यातील काळनिंबाळा येथील नऊ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचा सदस्य बिनविरोध निवडून आल्याने आठ जागेसाठी मतदान झाले. यात प्रकाश टिकंबरे यांच्या काँग्रेस पुरस्कृत पॅनलचे सात सदस्य विजयी झाल्याने ग्रामपंचायतीवर काँग्रेसने पुन्हा वर्चस्व सिद्ध केले आहे. राष्ट्रवादीच्या पॅनलला एका जागेवर विजय मिळाला असून, दोन सदस्य बिनविरोध निवडून आले. सहा जागेवर लढलेल्या भाजपला मात्र एकाही जागेवर विजय मिळविता आला नाही.

संशयित ताब्यात; मोबाइल हस्तगत

उस्मानाबाद : ढोकी पोलीस ठाण्याअंतर्गत दाखल असलेल्या मोबाइलचोरीच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आगळगाव (ता. बार्शी) येथील सूरज गायकवाड यास अटक करून त्याच्या ताब्यातून मोबाइलही हस्तगत केला. ही कारवाई पोउपनि पांडुरंग माने, पोना अमोल चव्हाण, पोकाँ आर्सेवाड, अविनाश मारपल्ले, मनोज मोरे यांच्या पथकाने १७ जानेवारी रोजी केली. या व्यक्तीस पुढील कारवाईसाठी ढोकी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

गोवंशाची वाहतूक एकाविरुद्ध गुन्हा

परंडा : गोवंशाची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या एकाविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. येथील दर्गाह रोड परिसरातील कुऱ्हाड गल्लीत पोलिसांच्या पथकाने १७ जानेवारी रोजी छापा टाकला. यावेळी परंडा येथील रहिवासी मोहसीन दस्तगीर कुरेशी हे अवैध कत्तल करण्याच्या उद्देशाने पिकअप वाहन (क्र. एमएच २५/ पी ३९८६)मधून ४ गायी व २ वासरांना दाटीवाटीने व कोणत्याही मूलभूत सुविधांशिवाय वाहतूक करताना आढळले. या प्रकरणी पोलीस अंमलदार किरण हावळे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून कुरेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

महिलेची फसवणूक; एकाविरुद्ध गुन्हा

तुळजापूर : वाळूचा ट्रक आल्याचे सांगत पाच हजार रुपये व सोन्याचे दागिने घेऊन महिलेची फसवणूक केल्याची घटना येथे घडली. शहरातील नागने प्लॉट भागात राहणाऱ्या शकुंतला देशमुख यांच्या घरी १५ जानेवारी रोजी दुपारी एक अज्ञात व्यक्ती आली. त्यांनी ‘तुमचा वाळूचा ट्रक आली असून, त्याचे पैसे द्या,’ असे देशमुख यांना सांगितले. यावर देशमुख यांनी त्यास पाच हजार रुपये रोख व १० ग्रॅम सोन्याचे दागिने दिले. मात्र, नंतर वाळूचा ट्रकही आला नाही अन्‌ तो व्यक्तीही परतला नाही. या प्रकरणी शकुंतला देशमुख यांच्या फिर्यादीवरून येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

घराचे कुलूप तोडून चोरी

वाशी : घराचे कुलूप तोडून आतील दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना मांडवा येथे १६ व १७ जानेवारीच्या रात्री घडली. मांडवा येथील श्रीपाद तावरे यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञाताने आतील दहा ग्रॅम सोन्याचे दागिने, २०० ग्रॅम चांदीचे पुजेचे साहित्य व रोख ७ हजार ५०० रुपये चोरून नेले. या प्रकरणी श्रीपाद तावरे यांच्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उभ्या कंटेनरमधून कपड्यांची चोरी

उस्मानाबाद : एका हॉटेलसमोर उभ्या केलेल्या कंटेनरमधील कपड्यांचे बॉक्स चोरीस गेल्याची घटना येडशी टोल नाका परिसरात १५ जानेवारी रोजी घडली. तामिळनाडूमधील श्रीशैलम येथून दिल्लीकडे होजीयरी कपडे घेऊन जाणारा कंटेनर १५ जानेवारी रोजी सकायी टोल नाका परिसरात एका हॉटेलसमोर थांबवून चालक लियाकत काटोला व सहचालक अरमान खान हे हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी गेले होते. तेथून परत आल्यानंतर कंटेनरच्या मागील दरवाजाचे कुलूप तुटल्याचे निदर्शनास आले. यामुळे त्यांनी आतील मालाजी खात्री केली असता, कपड्याचे आठ खोकी चोरीस गेल्याचे उघड झाले. या प्रकरणी चालकाच्या फिर्यादीवरून येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातप्रकरणी गुन्हा दाखल

नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील मारूती व सुग्रीव शामराव माने हे दोघे बंधू २६ डिसेंबर रोजी एमएच २५/ एआर ६३८५ या क्रमांकाच्या दुचाकीवरून सलगरा शिवारातून जात होते. यावेळी सलगरा (दि) येथील विशाल भालशंकर यांच्या दुचाकीची माने बंधू यांच्या दुचाकीला धडक बसली. यात मारुती माने हे किरकोळ जखमी झाले, तर सुग्रीव यांचा जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी मारुती माने यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात १७ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

वाहनाच्या धडकेत तिघेजण जखमी

उमरगा : वाहनाने दिलेल्या धडकेत तिघे जखमी झाल्याची घटना दाबका फाटा परिसरात घडली. दाबका येथील अमोल माने हे त्यांचा भाजा आदर्श दुर्गे याच्यासह १३ जानेवारी रोजी दुचाकीवरून गावाकडे जात होते. यावेळी एमएच १३/ बीएन १२९२ या क्रमांकाच्या चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीस धडक दिली. यात अमोल माने यांचा पाय मोडला, तर आदर्श यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. यानंतर, सदर वाहनाने पुढे जाऊन ग्रामस्थ आयुब कादरी यांनाही धडक दिल्याने त्यांचाही पाय मोडला. या प्रकरणी अमोल माने यांच्या फिर्यादीवरून येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Free Bintaka Surgery Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.