शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कंटेनरने बैलगाडीला उडविले; चिमुकल्यासह चौघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 23:11 IST

वेळा अमावस्या सण साजरा करून घराकडे परतत असताना घडला भीषण अपघात

उस्मानाबाद  -  वेळा अमावस्या सण साजरा करून घराकडे परतत असताना भरधाव कंटेनरने बैैलगाडीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी आहे. ही घटना औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव (ज.) पाटीनजीक बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.अधिक माहिती अशी की, कळंब तालुक्यातील वडगाव (ज.) येथील शेटे कुटुंबीय वेळा अमावस्या सण साजरा करण्यासाठी बुधवारी सकाळी बैलगाडी घेवून आपल्या शेतात गेले होते. सण साजरा करून ते सायंकळी बैलागडीतूनच गावाकडे परतत होते. ही बैैलगाडी गावाकडे जात असल्याचे पाहून माळवदे आणि पवार कुटुंबियही त्यात बसले. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही बैैलगाडी औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव (ज.) पाटीनजीक आली होती. 

याचवेळी औरंगाबादहून उस्मानाबादकडे निघालेल्या भरधाव कंटेनरने (क्र. केए.५६/४६५३) या बैलगाडीस जोराची धडक दिली. या अपघातात दोन महिला, एक मुलगी व एक मुलगा असे चारजण ठार झाले. यापैकी  फुनूबाई मंतू पवार (वय ६०), उमा महेश माळवदे (वय ३५), गुजंन माळवदे (वय १२) या तिघांचा जागीच मृत्यू झाला.  तर युवराज दत्तात्रय शेटे या पाच वर्षीय चिमुकल्याची उस्मानाबाद येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली. दरम्यान, दत्तात्रय नवनाथ शेटे (वय ३४) हे जखमी असून, उस्मानाबाद शहरातील एका खाजगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात एवढा भीषण होता की, लोखंडी बैलगाडी अक्षरश: चक्काचूर झाली आहे.

टॅग्स :AccidentअपघातOsmanabadउस्मानाबाद