मुरुम शहरामध्ये चार दिवस लसीकरण माेहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:23 IST2021-06-18T04:23:37+5:302021-06-18T04:23:37+5:30
मुरुम शहराची लोकसंख्या २५ हजारांच्या जवळपास असून शहरात आठ प्रभाग आहेत. शहरात कोरोनाच्या दोन्ही लाटेत कोरोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणात आढळून ...

मुरुम शहरामध्ये चार दिवस लसीकरण माेहीम
मुरुम शहराची लोकसंख्या २५ हजारांच्या जवळपास असून शहरात आठ प्रभाग आहेत. शहरात कोरोनाच्या दोन्ही लाटेत कोरोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणात आढळून आले होते. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या अधिक दिसून आली. शहरातील दुसऱ्या लाटेतील रुग्ण संख्या २५५ च्यावर गेली आहे, तर दुसऱ्या लाटेत या आजाराने आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट शहरात मार्च महिन्यात सुरू झाली. मार्चअखेरपर्यंत शहरात बोटावर मोजण्याइतकेच रुग्ण होते. एप्रिल व मे महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. यानंतर लॉकडाऊन, पालिकेने केलेल्या उपाययोजना आणि शासनांच्या नियमांची कडक अंमलबजावणी यामुळे शहरात जून महिन्यात कोरोना ओसरला. मागील आठ दिवस शहरात नव्याने रुग्ण आढळले नव्हते. शुक्रवारी शहरात तीन, तर ग्रामीण भागात एक अशा चार रुग्णांची भर पडली. शहरातील कोविड सेंटरमध्ये उमरगा व लोहारा तालुक्यातील २६ रुग्ण उपचार घेत आहेत. उपचारानंतर बरे झालेल्या एकाला डिस्चार्ज देण्यात आला, तर दोन गंभीर रुग्णांवर मुरुमच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. असे असतानाच शहरातील नागरिकांसाठी कोविशिल्ड लस देण्याचे नियाेजन केले आहे. यासाठी १ हजार ६०० डोस प्राप्त झाले आहेत.
चाैकट...
प्रत्येक सेंटरसाठी २०० डाेस
मुरुम शहरातील शुक्रवारी सकाळी नऊ ते दुपारी दोन यावेळेत नूतन प्राथमिक शाळा, ज्ञानदान विद्यालय येथे प्रत्येकी २०० डोस, शनिवारी जि.प.कन्या शाळेत व कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय येथे प्रत्येकी २००, सोमवारी शहरातील प्रतिभा निकेतन विद्यालय व अहिल्यादेवी होळकर समाजमंदिर येथे प्रत्येकी २००, मंगळवारी अंबाबाई मंदिर किसान चौक व जि. प. विशेष शाळा येथे प्रत्येकी २०० डाेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी दिली.