कंटेनर लूटप्रकरणी चौघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:43 IST2021-06-16T04:43:30+5:302021-06-16T04:43:30+5:30

एका ई कॉमर्स कंपनीचा माल बेंगळुरु येथून औरंगाबाद, मुंबईमार्गे दिल्लीकडे जात असताना एक कंटेनर सोमवारी पहाटे तेरखेडा गावाजवळ उलटला ...

Four arrested in container robbery case | कंटेनर लूटप्रकरणी चौघे ताब्यात

कंटेनर लूटप्रकरणी चौघे ताब्यात

एका ई कॉमर्स कंपनीचा माल बेंगळुरु येथून औरंगाबाद, मुंबईमार्गे दिल्लीकडे जात असताना एक कंटेनर सोमवारी पहाटे तेरखेडा गावाजवळ उलटला होता. याची माहिती मिळाल्यानंतर जवळच्याच वस्तीतील शेकडो लोकांनी या कंटेनरकडे धाव घेतली. यानंतर चालक जमशेद इद्रिस खान यांना धमकावत या लोकांनी कंटेनरचे कुलूप तोडून आतील इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, खाद्यपदार्थ, खुर्च्या, घड्याळे, सौंदर्यप्रसाधने असे साहित्य असलेले ८४६ खोकी पळवून नेले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवून जवळपास अर्धा माल ताब्यात घेतला. दरम्यान, याप्रकरणी चालक जमशेद इद्रिस खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून येरमाळा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या गुन्ह्यात सहभाग असलेल्या चाैघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहितीही पोलीस सूत्रांनी दिली. या गुन्ह्यात आणखी किती जणांचा समावेश होता, याचा तपास येरमाळा पोलीस करत आहेत.

Web Title: Four arrested in container robbery case