शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

चाळीस घरे, सहा हॉटेल्स जमीनदोस्त

By admin | Updated: July 12, 2017 22:06 IST

राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणासाठी संपादीत केलेल्या जागेवर उभारलेली घरे, हॉटेल रिकामे करण्यासाठी बुधवारी तुळजापूर तालुक्यातील

ऑनलाइन लोकमत

तामलवाडी(उस्मानाबाद), दि. 12 - राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणासाठी संपादीत केलेल्या जागेवर उभारलेली घरे, हॉटेल रिकामे करण्यासाठी बुधवारी तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे महसूल प्रशासनाने पोलीस बळाचा वापर करीत ४० घरे, ६ हॉटेल जेसीबी मशीनद्वारे जमीनदोस्त केली. ही अतिक्रमण मोहीम दिवसभर सुरू होती. ७५ पोलीस कर्मचारी व अधिकारी दिवसभर येथे ठाण मांडून होते.हा राष्ट्रीय महामार्ग गावाचे मध्यभागातून जातो. रुंदीकरणासाठी जमीन संपादन करून मावेजा वाटपाची कारवाई सुरू झाल्यानंतर बुधवारी भू-संपादन, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, उपविभागीय अधिकारी गिरासे, तहसीलदार दिनेश झांपले, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत खांडवी यांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी ८ वाजता घरे व हॉटेल पाडून रिकामे करण्यास प्रारंभ केला. रुंदीकरण कामात अडथळा ठरणारी घरे, हॉटेल जमीनदोस्त करून रुंदीकरण कामासाठी जागा मोकळी करण्यात आली. बंदोबस्तासाठी उस्मानाबाद येथून दोन दंगल नियंत्रक पथक पाचारण करण्यात आले होते, तर तामलवाडी पोलीस ठाण्यातील सपोनि नितीन मिरकर यांच्यासह ७५ पोलीस कर्मचारी कार्यरत होते.मावेजा वाटपात तफावततामलवाडी येथील शिवाजी रामा जगताप व साहेबराव रामा जगताप या दोघा भावांची जागा रस्ता रुंदीकरणासाठी राहत्या घरासह संपादीत झाली. दोघांच्या घराचे बांधकाम सारखे असताना शिवाजी जगताप यांना ४ लाख ४३ हजार, तर साहेबराव जगताप यांना २ लाख ६० हजार रुपये मावेजाची नोटीस ११ जुलै रोजी जारी केली. दिलेल्या नोटिसीत संपादीत क्षेत्राचा उल्लेखही करण्यात आलेला नाही. मावेजामध्ये तफावत दर्शविल्याने जागामालकांत संभ्रम निर्माण झाला आहे.सामान रस्त्यावर फेकले-बुधवारी सकाळी ११ वाजता हे पथक पोलीस ठाण्यानजिक मनिषा टी-हाऊसवर पोहोचले. यावेळी हॉटेल चालकाचे कसलेही म्हणणे ऐकून न घेता पोलीस व महसूल अधिकाऱ्यांनी खुर्च्या, टेबल एकत्रित करून सामान रस्त्यावर फेकले, तर पान टपऱ्या, सलून दुकानाचे मशीनने नुकसान केले. यावेळी सर्व व्यावसायिकांना यापूर्वीच नोटिसा देवून जागा रिकामी करण्याबाबत पूर्वकल्पना दिली असल्याचे महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले. एसटी सेवा गावाबाहेरून-माळुंब्रा गावातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग गावाबाहेर गेला असून, याच रस्त्यावरून वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे गावात येणारी एसटी बंद झाली आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. माळुंब्रा येथे राज्य परिवहन महामंडळाचा अधिकृत परवाना (थांबा) असतानाही प्रवाशांची गैैरसोय होत आहे.नोटिसीनंतर तासाभरात पाडकाम-जागा व घर यांचे नुकसानभरपाईपोटी भू-संपादन विभागाने तलाठ्यामार्फत बुधवारी सकाळी ८ वाजता १२ जणांना मावेजा उचलण्यासाठी नोटीस दिली. यानंतर तासाभरातच पाडकाम सुरू केले. त्यामुळे नुकसानग्रस्त नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. मावेजा खात्यावर जमा न करता जागा ताब्यात घेऊन चार मशीनने पाडकाम केले.