लॉकडाऊन काळातील भाडे माफ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:40 IST2021-07-07T04:40:18+5:302021-07-07T04:40:18+5:30

कळंब : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक व्यवसाय संकटात आले आहेत. याच धर्तीवर महामंडळाने किमान सर्व काही सुरळीत होईपर्यंतचे भाडे ...

Forgive the rent during the lockdown period | लॉकडाऊन काळातील भाडे माफ करा

लॉकडाऊन काळातील भाडे माफ करा

कळंब : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक व्यवसाय संकटात आले आहेत. याच धर्तीवर महामंडळाने किमान सर्व काही सुरळीत होईपर्यंतचे भाडे माफ करून त्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी कळंबच्या सर्व अस्थापन धारकांनी आगार प्रमुख मुकेश कोमटवार यांच्यामार्फत विभाग नियंत्रक व परिवहन मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

परिवहन महामंडळाच्या प्रत्येक स्थानकात रसवंती, बेकरी, फळाचे दुकाने, स्टेशनरी ,पुस्तक दुकान, वृत्तपत्र विक्रेता, सलून ,दूरध्वनी कक्ष, आईस्क्रीम सेंटर ,ब्युटीपार्लर अशी अनेक दुकाने सुरू झाली होती. परंतु, कोरोनामुळे प्रवाशी संख्या घटत असल्याने हे व्यवसाय ठप्प झाले. जिल्ह्यामध्ये या दुकानांची संख्या जवळपास चारशे आहे. दरम्यान, कोराेना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात राज्य शासनाने लॉकडाऊन केला होता. यामुळे सर्वच घटकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. शासन आणि काही खासगी घटक देखील मदतीला धावले आहेत. मात्र, बसस्थानकातील भाड्याने दुकाने असलेल्या परिवहन महामंडळाला काहीच सवलत दिली नसल्याने प्रश्न निर्माण झाला आहे. या धर्तीवर पूर्ण लॉकडाऊन काळातील एप्रिल, मे, जून २०२१ या तीन महिन्याचे भाडे माफ करावे, अशी मागणी सर्व आस्थापना धारकांनी आगार प्रमुख मुकेश कोमटवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर दिलीप चाळक, विलास मुळीक, दत्तात्र्य उमाप, हरिष धम्मावत, बब्रुवान शिंदे, सोमनाथ सुरवसे, करीम पठाण आदीच्या सह्या आहेत.

Web Title: Forgive the rent during the lockdown period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.