विदेशी दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:29 IST2021-01-22T04:29:48+5:302021-01-22T04:29:48+5:30

एकाविरुद्ध गुन्हा ढोकी : येथील पोलीस ठाण्याच्या पथकाने २० जानेवारी रोजी पेटमोल पंप चौकात छापा टाकला. यावेळी राजेंदम ढवारे ...

Foreign liquor confiscated | विदेशी दारू जप्त

विदेशी दारू जप्त

एकाविरुद्ध गुन्हा

ढोकी : येथील पोलीस ठाण्याच्या पथकाने २० जानेवारी रोजी पेटमोल पंप चौकात छापा टाकला. यावेळी राजेंदम ढवारे हे कल्याण मटका जुगाराचे साहित्य व रोख ४५० रुपयांसह पथकास मिळून आले. याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

तिघांवर कारवाई

कळंब : येथील बसस्थानकासमोर खाद्यपदार्थांच्या हातगाड्यावर मानवी जीवितास धोका होईल अशा पद्धतीने अग्नी प्रज्वलित केल्याप्रकरणी हरुण बागवान व हलीम बागवान या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई २० जानेवारी रोजी करण्यात आली.

धोकादायक पूल

(फोटो : बाबू खामकर)

पाथरुड : भूम तालुक्यातील पाथरुड गावावरून दुधोडी गावाला जाणाऱ्या रस्त्यावरील अवघ्या बारा फूट अरुंद पुलाच्या संरक्षक कठड्यांची दुरवस्था झाल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे याच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.

Web Title: Foreign liquor confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.