चारा छावणीतच बांधल्या रेशीमगाठी, पशुपालकच बनले व-हाडी अन् वाढपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 05:00 IST2019-05-30T05:00:40+5:302019-05-30T05:00:44+5:30
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे श्रध्दा बहु. सामाजिक संस्था व आई प्रतिष्ठान यांच्या वतीने सुरू असलेल्या चारा छावणीत बुधवारी शेकडो व-हाडींच्या उपस्थितीत छावणीतील दोन शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचा विवाह सोहळा पार पडला.

चारा छावणीतच बांधल्या रेशीमगाठी, पशुपालकच बनले व-हाडी अन् वाढपी
तेर : उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे श्रध्दा बहु. सामाजिक संस्था व आई प्रतिष्ठान यांच्या वतीने सुरू असलेल्या चारा छावणीत बुधवारी शेकडो व-हाडींच्या उपस्थितीत छावणीतील दोन शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचा विवाह सोहळा पार पडला.
राज्यातच सध्या भीषण पाणी व चारा टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर छावणीचालक सतीशकुमार सोमाणी यांच्या पुढाकारातून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. भंडारवाडी येथील सोनाली जोतीराम एडके व ज्ञानेश्वर पारप्पा देवकर (कार्ला) आणि तेर येथील निकिता बाळू देडे व गणेश लहू गवळी (रा. कळंब) यांचा विवाह पार पडला.
>संसारोपयोगी साहित्य दिले भेट
विवाह सोहळ्यात पशुपालकच वºहाडी अन् वाढपीही बनले. पशुपालक विवाहात पडेल ते काम करीत असताना दिसून आले.वधू-वरास पोषाख, मणी-मंगळसूत्रासह संसारोपयोगी साहित्य देण्यात आले. या सोहळ्यास खासदार ओम राजेनिंबाळकर, जिल्हा शिवसेना प्रमुख कैलास पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, उस्मानाबादचे तहसीलदार विजय राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती.