तुळजापुरात ठिकठिकाणी ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:15 IST2021-02-05T08:15:03+5:302021-02-05T08:15:03+5:30
येथील तहसील कार्यालयात ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पार पडला. याठिकाणी तहसीलदार सौदागर तांगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ...

तुळजापुरात ठिकठिकाणी ध्वजारोहण
येथील तहसील कार्यालयात ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पार पडला. याठिकाणी तहसीलदार सौदागर तांगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस पथक व एनसीसी पथक यांनी ध्वजास मानवंदना दिली. यावेळी काँग्रेस कमिटीचे आप्पासाहेब पाटील, अशोक मगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे गोकुळ शिंदे, मनसेचे अमर परमेश्वर, शिवसेनेचे श्याम पवार, भाजपाचे बाळासाहेब शामराव, नागेश नाईक, पुजारी मंडळाचे किशोर गंगणे, प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी, गणेश जळके, सहाय्यक निबंधक घुगे, नायब तहसीलदार, पेशकार, मंडलाधिकारी, तलाठी व महसूल कर्मचारी आदी उपस्थित होते.
श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासन कार्यालयात व्यवस्थापक तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, अभियंता राजकुमार भोसले, जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, मंदिर अधिकारी, मंदिर व सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समितीत समितीमध्ये सभापती विजयकुमार गंगणेच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सचिव उमेश भोपळे, कर्मचारी कुलदीप पवार व व्यापारी उपस्थित होते. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित श्री तुळजाभवानी शैक्षणिक संकुलात मुख्याध्यापक शिवाजी वागतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. एम. एस. मनेर, डॉ. शशिकांत दौंड, एनसीसी प्रमुख मेजर डोके यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात संस्था सचिव उल्हास बोरगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. मोहन बाबरे, उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव, कार्यालय अधीक्षक धनंजय पाटील, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा येथे शाळेचे मुख्याध्यापक सुनील पांचाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शालेय समिती प्रमुख सदानंद राव, प्रशालेतील सहशिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. तसेच नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी आशिष लोकरे, तहसीलदार सौदागर तांदळे, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. चंचला बोडके उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते नगरपालिकेत कोरोना काळात उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा, सफाई कामगारांचा व स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व नगरसेवक, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.