भूममध्ये ध्वजारोहण, सामूहिक प्रार्थना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:30 IST2021-04-15T04:30:37+5:302021-04-15T04:30:37+5:30
भूम : येथील भीमनगर येथे सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामूहिक प्रार्थना घेण्यात आली. ...

भूममध्ये ध्वजारोहण, सामूहिक प्रार्थना
भूम : येथील भीमनगर येथे सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामूहिक प्रार्थना घेण्यात आली. यावेळी यशवंत राजे थोरात यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भागवतराव शिंदे, धीरज शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. येथील गोलाई चौकात वंचित आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जयंती कमिटीचे अध्यक्ष संदीप सरवदे, विशाल शिंदे, अजय गायकवाड, अजू वाघमारे, चंद्रमणी गायकवाड आदी हजर होते. शहरातील रमाईनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामूहिक प्रार्थना व ध्वजारोहण पार पडले. यावेळी नगरपालिका गटनेते संजय गाढवे, पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, पोलीस उपनिरीक्षक आर.आर. गडवे, नगरसेविका सारिका थोरात, सुनील थोरात, पाटुळे, धम्मपाल शिंदे, पोना जानराव, ग्रामसेवक गायकवाड आदी उपस्थित होते. शहरात बहुतांश ठिकाणच्या मुख्य चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जयंती उत्सव साजरा करण्यात आला. शासकीय व निमशासकीय कार्यालयातदेखील अभिवादन करण्यात आले.
१) फोटो : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भूम येथील भीमनगरात मुख्य ध्वजारोहण यशवंत राजे थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भागवतराव शिंदे, धीरज शिंदे, चंद्रमणी गायकवाड आदी.
२) भूम शहरातील रमाईनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पालिका गटनेते संजय गाढवे, पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सुनील थोरात आदी.