पाचशे रुपये दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:33 IST2021-04-02T04:33:49+5:302021-04-02T04:33:49+5:30

रस्ते सामसूम कळंब : मागील काही दिवसापासून उन्हाची तीव्रता चांगलीच वाढत असून, यामुळे सकाळी अकरानंतर रस्ते निर्मनुष्य होत आहेत. ...

Five hundred rupees fine | पाचशे रुपये दंड

पाचशे रुपये दंड

रस्ते सामसूम

कळंब : मागील काही दिवसापासून उन्हाची तीव्रता चांगलीच वाढत असून, यामुळे सकाळी अकरानंतर रस्ते निर्मनुष्य होत आहेत. उन्हापासून बचावासाठी हातरूमाल, टोप्या, छत्र्यांना देखील मागणी वाढल्याचे बाजारपेठेत दिसत आहे.

अवैध दारू विक्री

अणदूर : अणदूरसह परिसरातील गावामध्ये अवैधरित्या दारू विक्रीसह मटका, जुगार यासारखे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तरूण पिढी याच्या आहारी जात असून, यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

कैऱ्यांना मागणी

उस्मानाबाद : सध्या बाजारपेठेत आंब्याच्या हिरव्या कैऱ्या विक्रीसाठी दाखल झाल्या असून, नागरिकांकडून याला चांगली मागणी असल्याचे चित्र आहे. यंदा हिरव्या कैऱ्यांच्या दरात अल्पशी वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

लसीकरणाला वेग

उमरगा : उमरगा तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिक उत्स्फूर्तपणे लसीकरणासाठी रुग्णालयात येत असून, कुठलीही भीती मनात न बाळगता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Web Title: Five hundred rupees fine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.