उस्मानाबादेत सुरू होणार पहिले टेस्ट ट्युब बेबी सेंटर

By Admin | Updated: October 31, 2014 00:34 IST2014-10-31T00:22:46+5:302014-10-31T00:34:34+5:30

उस्मानाबाद : शहरातील डॉ. राजगुरू यांच्या अक्षय हॉस्पिटलमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानासह मोड्युलर टेस्ट ट्युब बेबी सेंटर सुरू करण्यात येत आहे.

The first test tube baby center will be started in Osmanabad | उस्मानाबादेत सुरू होणार पहिले टेस्ट ट्युब बेबी सेंटर

उस्मानाबादेत सुरू होणार पहिले टेस्ट ट्युब बेबी सेंटर


उस्मानाबाद : शहरातील डॉ. राजगुरू यांच्या अक्षय हॉस्पिटलमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानासह मोड्युलर टेस्ट ट्युब बेबी सेंटर सुरू करण्यात येत आहे. या सेंटरचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते २ नोव्हेंबर रोजी होत असल्याची माहिती सेंटरचे डॉ. अदिनाथ राजगुरू यांनी गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. कौशाली राजगुरू यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ. राजगुरू म्हणाले की, अक्षय हॉस्पिटल आणि वंध्यत्व निवारण केंद्राच्या माध्यमातून आजवर हजारो अपत्यहीन जोडप्यांना अत्याधुनिक उपचार पध्दतीद्वारे अपत्य प्राप्तीचा आनंद दिला आहे. त्यामुळेच महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेशातूनही वंध्यत्त्वत्रस्त जोडपी येत गेली, आणि त्यांना अपत्य प्राप्तीचा आंनदही मिळत गेला. अनेक अद्ययावत उपचार करूनही अपत्य प्राप्ती होत नसल्यास शेवटचा पर्याय म्हणून टेस्ट ट्युब बेबी सेंटरकडे पाहिले जाते. परंतु, उस्मानाबाद व परिसरातील अपत्यहीन जोडप्यांना यासाठी पुणे, मुंबई, औरंगाबाद आदी ठिकाणी जावे लागत होते. तसेच खर्चही मोठ्या प्रमाणात होत असे. परंतु, उस्मानाबादसारख्या भागातील दाम्पत्यांना हा खर्च पेलावत नसे. हीच गरज लक्षात घेवून आम्ही उस्मानाबाद येथे हे सेंटर सुरू करण्याचे धाडसी पाऊल उचलले आहे. या सेंटरमध्ये जपान, इंग्लंड, डेन्मार्क, अमेरिका या देशातून अद्ययावत यंत्रसामुग्री उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच येथे असलेल्या ओहम डोनेशन (स्त्रीबीज दान), एम्ब्रीओ डोनेशन या सुविधांमुळे उपचार पद्धतीची यशस्वीता आणि परिणामकारकता सर्वाधिक असल्याचे डॉ. राजगुरू यांनी यावेळी सांगितले.
सदरील सेंटरचे उद्घाटन २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जयपाल चव्हाण, टेस्ट टयुब बेबी स्पेशालिस्ट डॉ. सचिन कुलकर्णी, सोलापूरच्या मार्र्कं डेय सहकारी रूग्णालयाचे अध्यक्ष डॉ. माणिक गुर्रम, बालरोग तज्ज्ञ डॉ. अभय शहापूरकर, डॉ. स्मिता शहापूरकर, एसबीआयचे चिफ मॅनेजर विजय डिकले आदींची प्रमुख उपस्थिती रहाणार आहे. सदरील कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही डॉ. राजगुरू यांनी केले आहे.
(वाणिज्य वार्ता)

Web Title: The first test tube baby center will be started in Osmanabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.