खत निर्मिती, शतावरी प्रकल्पाचे उद्‌घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:18 IST2021-02-05T08:18:18+5:302021-02-05T08:18:18+5:30

उस्मानाबाद : येथील व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयात राजेश संन्यासी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव अ‍ॅड. मिलिंद ...

Fertilizer production, inauguration of Asparagus project | खत निर्मिती, शतावरी प्रकल्पाचे उद्‌घाटन

खत निर्मिती, शतावरी प्रकल्पाचे उद्‌घाटन

उस्मानाबाद : येथील व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयात राजेश संन्यासी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव अ‍ॅड. मिलिंद पाटील, डॉ. अभय शहापूरकर, शेषाद्री डांगे, कमलाकर पाटील, सुषमा पाटील, प्राचार्य डॉ. प्रशांत चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रकाचे अनावरण तसेच वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या गांडूळ खत निर्मिती व शतावरी लागवड या प्रकल्पाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने अभ्यासक्रम व पुस्तकांचे क्यू आर कोड तयार केले व सॅनिटायझर च्या 100 बाटल्यांचे वाटप या वेळी करण्यात आले.

अचलेर ग्रामपंचायत

अचलेर : येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक ज्ञानेश्वर इंगळे यांनी संविधानाचे वाचन केले. यानंतर सरपंच प्रकाश लोखंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी सदस्य शिवराज कमलापुरे, सुनील बायस, अनंत घोडके, मल्लिनाथ आषञटगे, अनिल काकडे, उपसरपंच दिलीप माळगे आदी उपस्थित होते. सोसायटीमध्ये चेअरमन कलप्पा गोपने यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी व्हा. चेअरमन सिद्राम पत्तरके, दत्तू आष्टगे, गुंड्या स्वामी, वसंत कोकरे, गणपती कदारे, शिवानंद सरसळे, गोविंद चव्हाण, दस्तगीर पटेल, मल्लिनाथ कुंभार, लखन गोपने आदी उपस्थित होते. सार्वजनिक बाजार चौकात माजी सैनिक दयानंद कमलापुरे तर विद्याविकास हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक भास्कर बेडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कुष्टधाममध्ये अन्नधान्य वाटप

उस्मानाबाद : येथील देवा ग्रुप फाउंडेशनच्या शहरा जवळील कुष्टधाम येथे अन्नधान्य वाटप करण्यात आले. तसेच त्या परिसरात राहणाऱ्या गरजू लोकांना इतर खाद्यपदाार्थ व लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. सागर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेदिक कॉलेज समोरील राजमाता अहिल्याबाई होळकर चौकात येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळ फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष दत्ता माने, अतुल इंगळे, प्रसाद असलेकर, शुभम डोंगे, आकाश घोडके, अण्णा शेलार, सुधीर माने, शुभम शेंडगे, विशाल पवार, शुभम मुद्दे, कयफ, संदीप आंदळे, अनिकेत असलेकर, धीरज मेंढे, मासाळ खंडू, रोहीत भीद्रे, निसार शेख, किरण घुले, संकेत हाजगुडे आदी उपस्थित होते.

Web Title: Fertilizer production, inauguration of Asparagus project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.