निष्काळजीपणे वाहन चालविणे भाेवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:43 IST2021-01-08T05:43:26+5:302021-01-08T05:43:26+5:30

कायद्याचे उल्लंघन, ४३२ जणांवर कारवाई उस्मानाबाद : माेटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हाभरातील अठरा पाेलीस ठाणी व शहर वाहतूक ...

Feeling we have 'Run out of gas' emotionally | निष्काळजीपणे वाहन चालविणे भाेवले

निष्काळजीपणे वाहन चालविणे भाेवले

कायद्याचे उल्लंघन, ४३२ जणांवर कारवाई

उस्मानाबाद : माेटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हाभरातील अठरा पाेलीस ठाणी व शहर वाहतूक शाखेकडून ५ जानेवारी राेजी ४३२ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दंडापाेटी १ लाख २ हजार २०० रुपये तडजाेड शुल्क वसूल करण्यात आले. ही माेहीम यापुढेही सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे शहर वाहतूक शाखेकडून कळविण्यात आले.

जुगार अड्ड्यावर छापा, दाेघांवर गुन्हा

उस्मानाबाद : कळंब शहरातील हाेळकर चाैकातील जुगार अड्ड्यावर ६ जानेवारी राेजी कळंब पाेलिसांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत पथकाने जुगाराच्या साहित्यासह १ हजार ५० रुपये जप्त केले. याप्रकरणी सलीम बागवान (रा. गांधीनगर) व अन्य एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा नाेंद करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

अवैध दारूविक्री, तुराेरीत छापा

उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील तुराेरी येथील लक्ष्मण लिंबाेळे याने राहत्या गल्लीत अवैधरीत्या विक्री करण्यासाठी गावठी दारूचा साठा केला हाेता. ही माहिती मिळाल्यानंतर उमरगा ठाण्याच्या पथकाने छापा टाकला असता १ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी लिंबाेळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

अल्पवयीन मुलीचे अपहरण, गुन्हा दाखल

उस्मानाबाद : जिल्ह्यातील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना ४ जानेवारी राेजी घडली. यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी सर्वत्र शाेध घेतला; परंतु मुलगी मिळून आली नाही. यानंतर मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

Web Title: Feeling we have 'Run out of gas' emotionally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.