शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

उमरगाजवळ दाट धुक्यात कारचा भीषण अपघात; बिदरच्या एकाच कुटुंबातील ४ ठार, २ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 13:59 IST

दाट धुक्यात महामार्गांवरील वाहनाचा अंदाज न घेता अचानक दुसऱ्या कारने रस्त्यात प्रवेश केल्याने हा अपघात झाल्याचे कळते.

उमरगा ( धाराशिव): विजापूर येथे देवदर्शन करून आपल्या गावी परत जाणाऱ्या कारला अचानक दुसऱ्या कारने अचानक धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील काशीमपूर (प) येथील एकाच परिवारातील चार जण ठार तर दोन जणं गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील दाळिंब गावाजवळ मंगळवार दि. 21 रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर घडली. दाट धुक्यात महामार्गांवरील वाहनाचा अंदाज न घेता अचानक दुसऱ्या कारने रस्त्यात प्रवेश केल्याने हा अपघात झाल्याचे कळते.

याबाबतची माहिती अशी की,मंगळवारी पहाटे दाट धुके होते.यावेळी कर्नाटक राज्यातील बिदर जिल्हा जिल्ह्यातील काशीमपूर गावातील एकाच परिवारातील सखे चुलत भाऊ परिवारासह सोमवारी दि. 20 रोजी अमावस्या निमित्त विजापूर जिल्ह्यातील हुलजगीं येथील महालिंगरायाच्या यात्रेला गेले होते.रात्री दीड वाजता देव दर्शन करून कार क्रमांक (के.ए ३८ एम ९९४६) या गाडीने सर्वजण परत गावाकडे येत असताना उमरगा तालुक्यातील दाळिंब गावाच्या पुढे साईप्रसाद पेट्रोल पंपानजीक महामार्गांवर दुसऱ्या बाजूने सोलापूर दिशेने जाणारी कार क्र. (एम एच १४ ई पी ०७३२) ही गाडीच्या चालकाला दाट धुक्यामुळे रस्त्यावर असलेल्या वळणाचा अंदाज न आल्याने दुभाजकावरून दुसऱ्या बाजूला धावणाऱ्या कारवर जाऊन आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात रतीकांत मारूती बसगोंडा, वय ३० वर्षे ( चालक) रा.काशीमपूर (पी)ता.जिल्हा बिदर,शिवकुमार चितांनंद वग्गे वय २६ वर्षे, सदानंद मारुती बसगोंडा वय १९ वर्षे, संतोष बजरंग बसगोंडा वय १९ वर्षे सर्व राहणार काशीमपूर ता.जिल्हा बिदर कर्नाटक हे चार जण ठार झाले आहेत तर या कारमधील दिगंबर जगन्नाथ संगोळगी वय ३१ वर्षे रा.काशीमपूर हे जखमी झाले आहेत तर दुसऱ्या कारचा चालक लावण्य हणमंत मसोनी वय २२ वर्षे रा.सोलापूर हे जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच दाळिंब व शिवाजी नगर तांड्यातील दाळिंबचें सरपंच प्रशांत देवकते,बाबा जाफरी, शिवाजी जाधव, असिफ शिकार, अजीम लाडू,भास्कर राठोड यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु तर लागलीच मुरूम पोलीस ठाण्याचे सं. पो नी संदीप दहिफळे व पोलीस कर्मचारी घटना स्थळी धाव घेत मयत व जखमीना बाहेर काढले अपघात एवढा भयंकर होता की गाडित सर्वजण अडकल्याने जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढावे लागले. यावेळी सर्वांना तात्काळ उमरगा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले तर जखमी पैकी एकाला बिदर तर दुसऱ्यावर उमरगा येथे उपचार सुरु आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Umarga: Car crash in dense fog kills four, two injured.

Web Summary : Near Umarga, a devastating car accident in dense fog killed four from a Bidar family and injured two. The accident occurred when one car collided with another on the highway near Dalimb village. Over speeding and low visibility is the major reason for the accident.
टॅग्स :Accidentअपघातdharashivधाराशिव