शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

शेतकरीपूत्र जागीच ठार : भाजीपाला विकून गावाकडे परतताना दुचाकीला कंटेनरने उडवले

By बाबुराव चव्हाण | Updated: August 27, 2023 19:35 IST

एकुलता एक मुलगा गमावल्याने कुटुंबाचा आधार गेला...

येणेगूर (जि. धाराशिव) : शेतात पिकविलेला भाजीपाला मुरूम येथील बाजारपेठेत विक्री करून गावाकडे परतत असतानाच भरधाव कंटेनेरने दुचाकीला उडवले. या भीषण अपघातात ३३ वर्षीय शेतकरीपूत्र जागीच ठार झाला. एकुलता एक मुलगा गमावल्याने कुटुंबाचा आधार गेला आहे. ही घटना रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मुरूम मोड येथे घडली.

उमरगा तालुक्यातील सुपतगाव येथील ज्ञानेश्वर युवराज माने (३३) हे रविवारी भाजीपाला घेऊन मुरूमच्या बाजारात गेले हाेते. भाजीपाला विक्री करून साधारपणे दुपारी दीड वाजेच्या सुमारास दुचाकीवरून ते आपल्या गावाकडे परतत हाेते. त्यांची दुचाकी मुरूम माेडनजीक आली असता, नळदुर्गहून उमरग्याकडे निघालेल्या भरधाव कंटेनरने (क्र. एनएल.०१/२२९०) जाेराची धडक दिली.

या भीषण अपघातात दुचाकीस्वार ज्ञानेश्वर माने जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण हाेता की, दुचाकी अक्षरश: चक्काचूर झाली.  दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच येणेगूर दूरक्षेत्रचे पोहेकाॅं. संजय शिंदे, मारूती मडोळे, मसाळ यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यानंतर येणेगूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करण्यात आली. मुरूम पाेलीस ठाण्यात घटनेची नाेंद करण्यात आली असून पुढील तपास पाेहेकाॅं. संजय शिंदे हे करीत आहेत. दरम्यान, मयत ज्ञानेश्वर हा, एकुलता एक मुलगा हाेता. ताेही या अपघाती घटनेत गमावला. त्यामुळे माने कुटुंबाचा आधार गेला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दाेन मुले असा परिवार आहेत.

चालकाने केला पाेबारा...

उमरग्याच्या दिशेने निघालेल्या भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्यानंतर कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पाेबारा केला. पाेलीस आता संबंधित चालकाचा शाेध घेत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातFarmerशेतकरीDeathमृत्यू