शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

शेतकऱ्याच्या लेकीने मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 05:49 IST

साहेब, माझे पप्पा शेतकरी आहेत. मात्र, आमच्या जिल्ह्यात पेरणीच्यावेळी पाऊसच पडत नाही. मग शेतात काहीच धान उगवत नाही. यामुळे पप्पा सारखं टेन्शनमध्ये असतात...

- बालाजी अडसूळकळंब (जि़ उस्मानाबाद) : कडकनाथ घोटाळ्याची झळ उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही बसलेली आहे़ याच घोटाळ्यात फसलेल्या कळंब तालुक्यातील देवळालीतील एका शेतकºयाच्या तोंडून दररोज मरणाची भाषा ऐकणाºया त्याच्या तिसरीतील कन्येने थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहून मदतीसाठी आर्त हाक दिली आहे. धनश्री आश्रूबा बिक्कड असे तिचे नाव आहे. देवळाली जि. प. शाळेत तिसरीच्या वर्गात धनश्री शिकते. शिक्षक मारूती खुडे यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मान्यवरांना शुभेच्छापत्र लिहिण्यास विद्यार्थ्यांना सांगितले. धनश्रीने थेट मुख्यमंत्र्यांना शुभेच्छापत्र लिहिले होते. यात कष्टकरी बापाची निसर्ग व व्यवस्थेने कशी झोप उडवली आहे, हे तिने मांडले आहे. हे पत्र मंगळवारी सोशल मीडियात व्हायरल झाले.धनश्रीचे वडील आश्रूबा बिक्कड यांची कडकनाथ घोटाळ्यात फसगत झाली आहे. वडील मरणाची भाषा करीत असल्याने आपणास भीती वाटते, कडकनाथ घोटाळ्यात अडकलेले पैसे मिळवून देण्याची विनंती तिने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे़पप्पा टेन्शनमध्ये असतातधनश्री लिहिते, ‘‘साहेब, माझे पप्पा शेतकरी आहेत. मात्र, आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यात पेरणीच्यावेळी पाऊसच पडत नाही. मग शेतात काहीच धान उगवत नाही. यामुळे पप्पा सारखं टेन्शनमध्ये असतात. चिडचिड करतात. मम्मीवर रागावतात, माझ्यावरही चिडतात. यापेक्षा मरण बरं म्हणतात़ आमच्या शाळेत पेपर येतो, तो आम्ही वाचतो. यात शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या असतात. त्यामुळे लयं, लयं घाबरायला येते.’’ 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेFarmerशेतकरी