रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
By Admin | Updated: April 8, 2016 00:22 IST2016-04-08T00:07:52+5:302016-04-08T00:22:30+5:30
तामलवाडी : शेतात जनावरांना चारा-पाणी देण्यासाठी थांबलेल्या पन्नासवर्षीय शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला केल्याने यात शेतकरी गंभीर जखमी झाला

रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
तामलवाडी : शेतात जनावरांना चारा-पाणी देण्यासाठी थांबलेल्या पन्नासवर्षीय शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला केल्याने यात शेतकरी गंभीर जखमी झाला. ही घटना तुळजापूर तालुक्यातील देवकुरळी शिवारात गुरूवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुरूवारी शंभू महादेव सराटे हे शेतात बांधलेल्या पाळीव जनावरांना चारा-पाणी देण्यासाठी थांबले होते. दुपारी दोनच्या सुमारास शेळ्या इतरत्र गेल्याने त्यांना शोधण्यासाठी ते फिरत असतान झुडपात दबा धरून बसलेल्या रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला. या रानडुकराने पाच ते सहा ठिकाणी चावा घेतल्याने सराटे हे गंभीर जखमी झाले. चवताळलेल्या या रानडुकराच्या तावडीतून सराटे यांनी कशीबशी सुटका करून घेतली. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक शेताकडे धावले व त्यांनी सराटे यांना तातडीने तामलवाडी येथील खाजगी रुग्णालयात हलविले. (वार्ताहर)