शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
3
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
4
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
5
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
6
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
7
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
8
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
9
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
10
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
11
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
12
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
13
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
14
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
15
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
16
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
17
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
18
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
19
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
20
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?

लाचखोरांची भुताटकी बळीराजाच्या मानगुटीवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 18:27 IST

विश्लेषण : ‘अस्मानी’ संकटात अडकलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची लाचेच्या माध्यमातून ‘सुलतानी’ छळवणूक होत असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या वर्षभरात केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे़

- चेतन धनुरे 

अवर्षणाने उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी, सामान्यांच्या खिश्यात कडकी निर्माण केलेली असतानाही लाचखोर नोकरदारांचा खिसा मात्र, टम्म फुगताना दिसत आहे़ गेल्या वर्षभरात ३० कारवाया झाल्यानंतरही नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात पुन्हा दोन लाचखोर गळाला लागले़ यातही अवर्षणाप्रमाणेच लाचखोरीची भुताटकी शेतकऱ्यांच्याच मानगुटीवर बसलेली अधिक पहायला मिळतेय.

सततच्या अवर्षणाने ‘अस्मानी’ संकटात अडकलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची लाचेच्या माध्यमातून ‘सुलतानी’ छळवणूक होत असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या वर्षभरात केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे़ साल २०१८ मध्ये लाचखोरीची एकूण ३० प्रकरणे उजेडात आली़ यात ४३ लाचखोर जाळ्यात अडकले़ त्यांच्याकडून सुमारे ४ लाख ४८ हजार २०० रुपयांची लाच स्विकारण्यात आली होती़ यात अगदी ५०० रुपयांपासून ते १ लाख रुपयांपर्यंत लाच घेण्यात आली होती़ दरम्यान, या तीस कारवायांपैकी ९ कारवाया या शेतकरी, पशुपालकांच्या तक्रारीवरुन झाल्या आहेत़ सातबारा उतारा देण्यासाठी, फेर मंजूर करण्यासाठी, चराई पास देण्यासाठी ते कृषीपंपाला विद्युत जोडणी देण्यापर्यंत वेगवेगळ्या कारणासाठी लाचखोरांनी शेतकऱ्यांना पिळले़ उर्वरित २१ प्रकरणांमध्ये पोलिस, सहकार, कर, महावितरण अशा विविध विभागांनी वेगवेगळ्या कारणास्तव नागरिकांकडून लाच घेतली.

दरम्यान, चालू वर्षातील अजून महिना संपत नाही तापर्यंत आणखी दोघे लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले़ ही दोन्ही प्रकरणेही शेतकऱ्यांशी संबंधितच आहेत़ रेशीम शेतीतील कुशल कामाचे बील काढण्यासाठी शेतकऱ्याकडून तांत्रिक सहायकाने ४५०० रुपये घेतले तर परवाच एका तलाठ्याने फेर मंजूर करुन देऊन सातबारा उतारा देण्यासाठी शेतकऱ्याकडून १२०० रुपये घेतले़ शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसलेली ही लाचखोरांची भुताटकी अवर्षणकाळातही त्यांचा पिच्छा सोडताना दिसत नाही़

राज्यात आहे अशी स्थिती़महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांतील लाचखोरी, कारवायांचे अवलोकन केल्यास वरचेवर आकडेवारी वाढतच चालल्याचे दिसते़ २०१० साली ४८६ लाचखोरीचे प्रकरणे उजेडात आली होती़ २०११ मध्ये ४७९, २०१२ मध्ये ४८९, २०१३ मध्ये ५८३ कारवाया झाल्या होत्या़ २०१४ मध्ये त्या दुपटीपेक्षा जास्त वाढून १२४५ वर पोहोचल्या़ २०१५ मध्ये १२३४, २०१६ मध्ये ९८५, २०१७ मध्ये ८७५, तर २०१८ मध्ये ८९१ कारवाया झाल्या आहेत़ 

लाचेची रक्कमही वाढली़राज्यात लाचलुचपतने केलेल्या कारवायांमध्ये कोट्यवधींची लाच रक्कम पकडली़ २०१८ मध्ये ही रक्कम ४ कोटी ४४ लाख ८ हजार ३७८ रुपये इतकी होती़ २०१७ मध्ये २ कोटी २१ लाख, २०१६ मध्ये २ कोटी ६८ लाख, २०१५ मध्ये २ कोटी ४६ लाख, २०१४ मध्ये २ कोटी ५५ लाख, २०१३ मध्ये १ कोटी ८४ लाख तर २०१२ मध्ये ८० लाख इतकी लाचेची रक्कम पकडण्यात आली़ अगदी अलिकडच्या चार वर्षातील रोकड पाहिल्यास तुलनेने कारवाया कमी होऊनही २०१८ मध्ये तब्बल ४ कोटीहून अधिक रक्कम पकडण्यात आली आहे़

लाचखोरी वाढली की कारवाया ?भ्रष्टाचार, पारदर्शकता अशा मुद्यांवर रान माजवून २०१४ मध्ये रालोआचे सरकार सत्तेत विराजमान झाले़ तेव्हापासून लाचखोरीचे आकडे जवळपास दुपटीने वाढले आहेत़ याचा अर्थ जो तो सोयीने काढू शकतो़ या सरकारच्या काळात लाचखोरी वाढल्याचे निदर्शक हे आकडे असल्याचा एक अर्थ काढता येईल़ तसाच या अर्थाच्या अगदी विरुद्ध लाचखोरांवरील कारवाया वाढविल्याने हे आकडे वाढले, असाही एक अर्थ निघतो़ वस्तुस्थिती काय, हा मात्र संशोधनाचा भाग ठरेल.

टॅग्स :FarmerशेतकरीCorruptionभ्रष्टाचारPoliceपोलिस