बोअरच्या ट्रकखाली चिरडून शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:53 IST2021-05-05T04:53:50+5:302021-05-05T04:53:50+5:30

तुळजापूर तालुक्यातील लोहगाव शिवारात शेतकरी महादेव शेषराव जाधव (६५, रा. येडोळा) यांचे शेतशेजारी शहापुरे यांच्या शेतात सोमवारी रात्री बोअर ...

Farmer dies after being crushed under Boer's truck | बोअरच्या ट्रकखाली चिरडून शेतकऱ्याचा मृत्यू

बोअरच्या ट्रकखाली चिरडून शेतकऱ्याचा मृत्यू

तुळजापूर तालुक्यातील लोहगाव शिवारात शेतकरी महादेव शेषराव जाधव (६५, रा. येडोळा) यांचे शेतशेजारी शहापुरे यांच्या शेतात सोमवारी रात्री बोअर घेण्यात येत होता. महादेव जाधव हे यावेळी तेथे बोअरचे काम पाहत थांबले होते. दरम्यान, रात्री अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे जाधव यांच्यासह इतर काही जण बोअर मारणाऱ्या ट्रकखाली (क्र. टीएन ३४ एफ ६३७९) आडोसा घेऊन बसले. दरम्यान, जाधव हे नेमके चाकालगतच बसलेले होते. काही वेळाने पाऊस कमी झाल्यानंतर चालकाने ट्रक सुरू करून तो पाठीमागे घेतला. तेव्हा चाकालगत बसलेल्या महादेव जाधव यांच्या अंगावरून चाक गेल्याने ते चिरडून जागीच मृत्यूमुखी पडले. या घटनेचा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जळकोटच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला. याप्रकरणी नळदुर्ग ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

040521\04osm_1_04052021_41.jpg

मयत महादेव जाधव

Web Title: Farmer dies after being crushed under Boer's truck