बलसूर येथे शेतीशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:40 IST2021-07-07T04:40:16+5:302021-07-07T04:40:16+5:30
बलसूर : उमरगा तालुक्यातील बलसूर येथे सोमवारी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, पं.स. उमरगा व कृषी विभाग उमरगा यांच्या ...

बलसूर येथे शेतीशाळा
बलसूर : उमरगा तालुक्यातील बलसूर येथे सोमवारी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, पं.स. उमरगा व कृषी विभाग उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने शेतीशाळा घेण्यात आली. यात कृषी व्यवस्थापक किशोर औरादे यांनी पोषण बाग, बांधावर व सलग आंबा वृक्षलागवड, गांडूळ खत, नॅडेप खत आदी योजनांची माहिती दिली. पोखरा प्रशिक्षिका सुलक्षणा गोडसे यांनी निंबोळी अर्कची माहिती दिली, तसेच पोकरा प्रशिक्षिका करुणा बोरकडे व संपदा डोंगरे यांनी जैविक कीड नियंत्रण या विषयी माहिती दिली. अनिता गोविंद लाळे यांच्या पोषण बागेस भेट देऊन मटकी, भेंडी, टोमॅटो, मिरची, वांगी आदींची पाहणी करण्यात आली. या शेती शाळेसाठी कृषिसखी कांचन हिंगमिरे, बँक सखी भाग्यश्री वाघमोडे, सी.आर.पी अंबिका डमडरे, सावली ग्राम संघाच्या अध्यक्षा अनिता रणखांब यांनी पुढाकार घेतला.