शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

"...तर फडणवीस, मोदी यांनाही किंमत मोजावी लागेल!"; मोर्चा रोखण्यावरून जरांगेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 17:15 IST

जो पुढारी गावात थांबेल, त्याला पाडाच; मनोज जरांगे पाटील यांचे समाजास आवाहन

धाराशिव : मराठा आरक्षणासाठी मुंबईवर धडकणाऱ्या २९ ऑगस्टच्या मोर्चात ग्रामपंचायत सदस्यापासून ते मंत्र्यांपर्यंत सर्वांनाच सहभागी होण्यास सांगणार आहोत. जे येणार नाहीत, त्यांच्यावर आमचे लक्ष असणार आहे. जे इथेच गल्लीत थांबतील, त्यांना येत्या निवडणुकीत पाडाच, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी धाराशिव येथून केले.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी २९ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईवर मोर्चा जाणार आहे. २७ ऑगस्टला आंतरवाली येथून हा मोर्चा रवाना होईल. या पार्श्वभूमीवर पाटील हे जिल्हानिहाय बैठका घेऊन समाजाला आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत. या बैठकांची सुरुवात त्यांनी मंगळवारी धाराशिव येथून केली. समाजातील प्रमुख व्यक्ती, समन्वयकांसोबत सकाळी त्यांनी बैठक घेऊन चर्चा केली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, मोर्चाचे स्वरुप समुद्रापेक्षा विराट असलेले पहायला मिळेल. आम्ही १०० टक्के जिंकणार आहोत. ओबीसी आरक्षण घेऊनच परत येणार. समाज बांधवांनी सण-वार करीत बसू नये. सर्वांनी मोर्चात सहभागी व्हावे. यावेळी आरपारची लढाई आहे. विजय निश्चित मिळणार आहे. या विजयाचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.

दरम्यान, सरकारकडून अद्याप कोणीही संपर्कात नाही. आम्ही त्याची अपेक्षाही करीत नाही. मागच्या वेळी चर्चेत आरक्षणासाठी आधार हवा, असे सांगितले होते. आता ५८ लाख कुणबी नोंदणी सापडल्या आहेत. यापेक्षा मोठा आधार आणखी काय हवा? त्यामुळे आता आरक्षण द्यावेच लागेल, असेही जरांगे पाटील म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना इशारा, मोर्चा रोखाल तर...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर यावेळी पोलिसांच्या माध्यमातून मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ते महागात पडेल. ही धमकी नाही तर, सावध करतोय. मराठा समाजाने रौद्ररूप धारण केल्यास काय होईल, याची कल्पनाच न केलेली बरी. केवळ फडणवीसच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही यावेळी किंमत मोजावी लागेल. अगदी देशाच्या सत्तेलाही हादरा बसेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण