राजेनिंबाळकरांच्या वाढदिनी ढोकीत नेत्रतपासणी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:35 IST2021-08-19T04:35:53+5:302021-08-19T04:35:53+5:30

शिबिराचे उद्घाटन भारत देशमुख, उद्धव समुद्रे, बालाजी सुरवसे, पंचायत समितीचे सदस्य संग्राम देशमुख, पांडुरंग वाकुरे, डी. एम. पाटील, शिवसेना ...

Eye check-up camp at Dhoki on Rajenimbalkar's birthday | राजेनिंबाळकरांच्या वाढदिनी ढोकीत नेत्रतपासणी शिबिर

राजेनिंबाळकरांच्या वाढदिनी ढोकीत नेत्रतपासणी शिबिर

शिबिराचे उद्घाटन भारत देशमुख, उद्धव समुद्रे, बालाजी सुरवसे, पंचायत समितीचे सदस्य संग्राम देशमुख, पांडुरंग वाकुरे, डी. एम. पाटील, शिवसेना विभागप्रमुख गुणवंत देशमुख, आदी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेच्या वतीने शिबिरास उपस्थित असलेल्या मान्यवरांचे व परंडा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन शेटे, प्राढोकीतील नेत्रचिकित्सा अधिकारी डॉ. जी. आर. राऊत, येरमाळ्याचे डॉ. बी. एन. घेवाड यांचे स्वागत करण्यात आले.

शिबिरास खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या सौभाग्यवती व संस्थेच्या अध्यक्षा संयोजनी राजेनिंबाळकर यांनी सदिच्छा भेट देऊन तपासणीस आलेल्या नागरिकांची विचारपूस केली. शिबिरासासाठी संस्थेचे व्यवस्थापक संजय भुतेकर, पवनराजे निंबाळकर टेक्निकल इन्स्टिट्यूटचे प्रा. बालाजी जाधव, खासदारांचे स्वीय साहाय्यक समाधान शिंदे, राणी भुतेकर, सूरज तौर, अनिल चव्हाण, विशाल घाडगे, विजय लोंढे, आदींनी पुढाकार घेतला.

Web Title: Eye check-up camp at Dhoki on Rajenimbalkar's birthday