मराठी भाषादिनी पुस्तकांचे प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:00 IST2021-03-04T05:00:07+5:302021-03-04T05:00:07+5:30
विविध विकास कामांचा शुभारंभ नळदुर्ग : येथील नगर परिषदेकडून करण्यात येणाऱ्या विविध ११ विकास कामांचा प्रारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक ...

मराठी भाषादिनी पुस्तकांचे प्रदर्शन
विविध विकास कामांचा शुभारंभ
नळदुर्ग : येथील नगर परिषदेकडून करण्यात येणाऱ्या विविध ११ विकास कामांचा प्रारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक जगदाळे व जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य शिवाजीराव मोरे यांच्या हस्ते झाला. पालिकेच्या वतीने १ कोटी ६० लाख रूपये खर्चून विविध योजनेंतर्गत हुतात्मा स्मारक समोरील रस्ता, रहीमनगर, ख्वॉजानगर, इंदिरा नगर व वडारवाडा या भागात सिमेंट रस्ता होत आहे. यावेळी नगरसेवक महालिंग स्वामी, माजी नगरसेवक शब्बीर कुरेशी, किशोर बनसोडे, संजय जाधव आदी उपस्थित होते.
घरकुलाच्या कामाचा पिंपळगावात प्रारंभ
कळंब : तालुक्यातील पिंपळगाव (डो) येथे रमाई आवास घरकूल योजनेंतर्गत सन २०१९-२०२० च्या पुरवणी यादीत नव्याने ३१ लाभार्थ्यांच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली. या कामाचा प्रारंभ राकाँ तालुकाध्यक्ष श्रीधर भवर यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी पं. स. उपसभापती गुणवंत पवार, सरपंच संगीता स्वामी, राकाँ कार्याध्यक्ष सुरेश टेकाळे, माजी सरपंच सुखदेव टेकाळे, अंगद टेकाळे, ग्रामसेवक इम्रान पठाण, शशिकांत टेकाळे, अभिजीत टेकाळे, मधुकर टेकाळे, राकेश घोडके, शुभम, अशोक जगताप आदी उपस्थित होते.
बससेवा सुरू करण्याची मागणी
तुळजापूर : येथील आगारातून अपसिंगा-कामठा मार्गे उस्मानाबाद अशी बस सुरू करावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आगार प्रमुख राजकुमार दिवटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके, तालुकाध्यक्ष रोहित चव्हाण, समर्थ पैलवान, सरचिटणीस मयूर दराडे, रणजीत पलंगे, केतन क्षीरसागर, आदित्य शेट्टे आदी उपस्थित होते.
परड्यांचे विल्हेवाट
तुळजापूर : येथील श्री तुळजाभवानी मंदिर परिसरातील भाविकांनी सूतक व जीर्ण झाल्याने सोडलेल्या परड्यांची एका देवी भक्ताने स्थानिकांना सोबत घेऊन पाचुंदा तलाव परिसरात विल्हेवाट लावली. यामुळे या परड्यांची विटंबना थांबली आहे.
बारखडे यांची निवड
उस्मानाबाद : तालुक्यातील बोरगाव (राजे) येथील रहिवासी ॲड. निलेश बारखडे यांची राकाँ लीगल सेल जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली. प्रदेशाध्यक्ष ॲड. अशिष देशमुख यांनी त्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार केला.