दोन दिवसांत १०० रुग्णांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:29 IST2021-08-01T04:29:53+5:302021-08-01T04:29:53+5:30
उमरगा : तालुक्यातील सास्तूर येथील प्राईड इंडिया स्पर्श रुग्णालयामार्फत सुरू असलेल्या फिरत्या मोबाईल मेडिकल युनिटच्या साहाय्याने काटेवाडी येथे दोन ...

दोन दिवसांत १०० रुग्णांची तपासणी
उमरगा : तालुक्यातील सास्तूर येथील प्राईड इंडिया स्पर्श रुग्णालयामार्फत सुरू असलेल्या फिरत्या मोबाईल मेडिकल युनिटच्या साहाय्याने काटेवाडी येथे दोन दिवसात १०० रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी डॉ. रमाकांत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर, नर्स, तंत्रज्ञ आदी कर्मचारी
मोबाईल मेडिकल युनिट या फिरत्या आरोग्य वाहनातून दुर्गम वाड्या-वस्त्यांवर जाऊन रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करीत आहेत. यात औषधोपचार, लसीकरण, गरोदर माता प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्चात सेवा, ज्येष्ठ नागरिकांची तपासणी, उपचार, इ.सी.जी आदी सुविधा पुरविल्या जात आहेत. या अभियानाचा शुभारंभ सरपंच रंजीत गायकवाड, रामराव जाधव, डॉ. भालचंद्र भोसले, शांत काकडे, राम मुगले, नंदकिशोर भोसले, सचिन भोसले, रवी भोसले, राम क्षीरसागर, आशाताई मरकडं, कुंडलिक क्षीरसागर, मनोज सूर्यवंशी, फातिमा जमादार, अंगणवाडी सेविका उर्मिला कांबळे, इमाम सोलापूरे, राम इंगोले, मदतनीस लक्ष्मीबाई सुर्यवंशी, चंद्रकांत सूर्यवंशी, गोपीनाथ भोसले आदींच्या उपस्थितीत करण्यात आला.