चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त उमरगा, लोहाऱ्यात कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:43 IST2021-01-08T05:43:48+5:302021-01-08T05:43:48+5:30
उमरगा : आ. ज्ञानराज चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी शिवसेनेच्या वतीने तुळजाभवानी अंध व मतिमंद बालकांचे वसतिगृह येथे विद्यार्थ्यांना ...

चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त उमरगा, लोहाऱ्यात कार्यक्रम
उमरगा : आ. ज्ञानराज चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी शिवसेनेच्या वतीने तुळजाभवानी अंध व मतिमंद बालकांचे वसतिगृह येथे विद्यार्थ्यांना फळे, अल्पोपहार, सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, नगरसेवक पंढरीनाथ कोणे, प्रदीप मदने, काका गायकवाड, बाजार समितीचे संचालक सचिन जाधव, विधानसभा संघटक शरद पवार, गोपाळ जाधव, काका गायकवाड, संदीप चव्हाण, बालाजी बनसोडे, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख संदीप चौगुले, पंकज जगताप, मेहदी लंगडे आदी उपस्थित होते. दरम्यान, यानिमित्त ७ जानेवारी रोजी उमरगा व लोहारा शहरात महारक्तदान शिबीर तसेच गरजू रुग्णांसाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
वाढदिवसानिमित्त मडके यांचा सत्कार
(फोटो : श्रीकांत मडके ०५)
मोहा : येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट व मोहेकर ॲग्रो इंडस्ट्रीजचे चेअरमन हनुमंत मडके यांच्या वाढदवसानिमित्त परिसरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळी तसेच विविध संघटनांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यानिमित्त मोहेकर कारखान्यावर वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी माजी आमदार दयानंद गायकवाड, मोहाचे सरपंच राजू झोरी, बाबासाहेब मडके, मोहेकर मल्टीस्टेटचे कार्यकारी संचालक विशाल मडके, मोहेकर ॲग्रोचे कार्यकारी संचालक संतोष मडके, सतीश जोशी, संस्थेचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.