शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

केसला घाबरुन नव्हे, ‘सबका विकास’साठी भाजपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 14:47 IST

गेल्या काही वर्षांपासून विकासाची प्रक्रियाच ठप्प झाली आहे़

ठळक मुद्देराणा पाटील यांनी केली भाजप प्रवेशाची घोषणा शेजारच्याच लातूर, सोलापूर जिल्ह्यात प्रचंड मोठ्या प्रकल्प

उस्मानाबाद : राज्याभरासाठी बहुचचर्चित ठरलेले उस्मानाबादच्या पाटील कुटूंबियांच्या पक्षांतरावर शनिवारी अखेर शिक्कामोर्तब झाले़ राष्ट्रवादीचे माजी मंत्री आ़राणा पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात ही घोषणा जाहीर केली़ ती करताना हत्याकांडाच्या केसला घाबरुन नव्हे तर उस्मानाबादला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे पाटील म्हणाले़

शरद पवारांसोबत चार दशकांहून अधिक काळ सावलीसारखे उभे राहणाऱ्या या कुटूंबाने ‘ते आदरणीय होते, आहेत व राहतील’ असे सांगत त्यांची साथ सोडली़ डॉ़पद्मसिंह पाटील व आ़ राणा पाटील यांनी शनिवारी उस्मानाबादेत निर्णय घेण्यासाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधला़ यावेळी राष्ट्रवादीतील काही पदाधिकारीही त्यांच्यासमवेत मंचावर उपस्थित होते़ प्रारंभी या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

त्यानंतर आ़ राणा पाटील यांनी संवाद साधला़ ते म्हणाले, उस्मानाबादसाठी डॉ़पाटील यांनी काय केलं, हे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही़ मात्र, गेल्या काही वर्षांपासून विकासाची प्रक्रियाच ठप्प झाली आहे़ कृष्णा खोऱ्यातील आपल्या हक्काचे पाणी अजून मिळाले नाही़ कौडगाव एमआयडीसीत उद्योग आले नाहीत़ दुसरीकडे शेजारच्याच लातूर, सोलापूर जिल्ह्यात प्रचंड मोठ्या प्रकल्पांची मुहूर्तमेढ झाली़ देश एकिकडे ‘सबका साथ, सबका विकास’च्या प्रवाहात असताना, उस्मानाबाद यात मागे राहू नये, म्हणून काळजावर दगड ठेवत हा पक्षांतराचा निर्णय घेत असल्याचे सांगून आ़पाटील यांनी भाजपात प्रवेश करीत असल्याची घोषणा केली़ सध्या राजकारणात सक्रीय नसले तरी डॉ़पद्मसिंह पाटील हेही व्यासपीठावर उपस्थित होते़ अखेरीस त्यांनी पुत्र राणा पाटील व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या निर्णयास आपल्या शुभेच्छा असल्याचे सांगितले़

आमच्या सत्ताकाळातही संघर्षचराणा पाटील यांनी सत्तासंघर्षाची पदर उलगडून सांगताना आपण मंत्री राहिलो तरी तेव्हाही मोठा संघर्ष करावा लागत असल्याचे सांगितले़ कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याची योजना डॉ़पाटलांनी मंजूर करुन घेतली होती़ त्यास २० वर्षे उलटल्यानंतरही हे पाणी आपल्याकडे येऊ शकले नाही़ मी मंत्री राहिलो असलो तरी, संघर्षच करावा लागत होता, अशी शब्दांत त्यांनी राष्ट्रवादी सोडण्यामागचे हेही एक अंतर्गत कारण स्पष्ट केले़

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाOsmanabadउस्मानाबाद