लसीकरणात ४५ ते ५९ वयोगटातील व्यक्तींमध्ये उत्साह जास्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:34 IST2021-04-09T04:34:42+5:302021-04-09T04:34:42+5:30
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर महिन्यात झपाट्याने रुग्ण वाढत होते. या कालावधीत जिवाची पर्वा न करता डॉक्टर तसेच आरोग्य ...

लसीकरणात ४५ ते ५९ वयोगटातील व्यक्तींमध्ये उत्साह जास्त !
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर महिन्यात झपाट्याने रुग्ण वाढत होते. या कालावधीत जिवाची पर्वा न करता डॉक्टर तसेच आरोग्य विभागातील इतर कर्मचारी कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करीत होते. पोलीस विभागही फ्रंटलाईनवर येऊन काम करीत होता. महसूल विभाग, पालिकेतील कर्मचारी सेवा बजावत हाेते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पहिल्या टप्प्यात या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर पहिल्या लाटेत सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक व दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना बसला होता. या व्यक्तींना १ मार्च पासून लस देण्यात येत आहे. त्यानंतर १ एप्रिल पासून ४५ वर्षापुढील सर्वच व्यक्तींना लस टोचली जात आहे. ७ एप्रिलपर्यंतच्या लसीकरणाच्या आकडेवारीत ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांमध्ये जास्त उत्साह दिसून येत आहे.
ग्रामीण भागातही लसीकरण
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात मोजक्याच केंद्रावर लसीकरण मोहीम राबवली जात होती. नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व काही उपकेंद्रावरही लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही सध्या आरोग्याबाबत काळजी घेतली जात आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसह ४५ ते ५९ वयोगटातील पुरुष, महिला लसीकरणासाठी पुढे येत आहेत.
पॉईंटर...
९३
लसीकरण केंद्र
८४९८
हेल्थ केअर वर्कर
११४५८
फ्रंटलाईन वर्कर
२७५८७
ज्येष्ठ नागरिक
३५१८८
४५ वयापेक्षा जास्त
पहिला डोस घेतलेले एकूण
५५१४४
दुसरा डोस घेतलेले एकूण
७२८६
चौकट...
४२ केंद्रावर लसीकरण
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात मोजक्याच रुग्णालयात लसीकरण सुरु होते.
रुग्ण संख्या वाढू लागल्याने लसीकरणाचा वेगही वाढविण्यासाठी केंद्रही वाढविण्यात आले आहेत. सध्या केंद्राची एकूण संख्या ९३ इतकी असून, यापैकी ४२ केंद्र सुरु आहेत. काही केंद्रावर परिपूर्ण स्टाफ नसल्यामुळे रोटेशन पद्धतीने मोहीम राबविण्यात येत आहे.
कोट...
जिल्ह्यात लसीकरण मोहीम सुरळीत सुरू आहे. ग्रामीण भागातही लसीकरण केले जात आहे. ज्येष्ठ नागरिकांसह दुर्धर आजाराने ग्रस्त व ४५ वर्षापुढील नागरिकही लस टोचून घेत आहेत. लसीबाबत भीती न बाळगता नागरिकांनी लस टोचून घ्यावी.
-डॉ. कुलदीप मिटकरी, लसीकरण अधिकारी