विद्युतपंप लंपास, अज्ञातावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:41 IST2020-12-30T04:41:50+5:302020-12-30T04:41:50+5:30

अल्पवयीन मुलीचे केले अपहरण उस्मानाबाद -जिल्ह्यातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे २८ डिसेंबरच्या पहाटे अज्ञाताने अपहरण केले. कुटुंबियांनी तिचा ...

Electric Pump Lampas, Crime on Unknown | विद्युतपंप लंपास, अज्ञातावर गुन्हा

विद्युतपंप लंपास, अज्ञातावर गुन्हा

अल्पवयीन मुलीचे केले अपहरण

उस्मानाबाद -जिल्ह्यातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे २८ डिसेंबरच्या पहाटे अज्ञाताने अपहरण केले. कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शाेध घेतला. परंतु, मुलगी मिळून आली नाही. या प्रकरणी मुलीच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरूद्ध भादंसंचे कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

किरकाेळ कारणावरून एकास मारहाण

उस्मानाबाद - कळंब तालुक्यातील शेळका धानाेरा येथील संदीप चंद्रकांत शेळके हे २६ डिसेंबर राेजी आपल्या शेतात हाेते. याचवेळी नातेवाईक विश्वंभर शेळके यांनी वाहन देत नसल्याच्या कारणावरून संदीप यांना शिवीगाळ केली. तसेच काठीने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी संदीप शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २८ डिसेंबर राेजी कळंब ठाण्यात विश्वंभर शेळके यांच्याविरूद्ध गुन्हा नाेंद झाला आहे.

Web Title: Electric Pump Lampas, Crime on Unknown