महाराष्ट्र नाभिक महामंडळ पदाधिकाऱ्यांच्या निवडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:37 IST2021-08-20T04:37:36+5:302021-08-20T04:37:36+5:30

यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्य संघटक किशोर राऊत, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी संत सेना महाराज ...

Elections of Maharashtra Nuclear Corporation office bearers | महाराष्ट्र नाभिक महामंडळ पदाधिकाऱ्यांच्या निवडी

महाराष्ट्र नाभिक महामंडळ पदाधिकाऱ्यांच्या निवडी

यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्य संघटक किशोर राऊत, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी संत सेना महाराज व विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तींचे पूजन करण्यात आले. यानंतर बैठकीत विविध विषयांवर तसेच संत सेना महाराज पुण्यतिथी कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी महामंडळ पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. यात जिल्हा उपाध्यक्षपदी बापुराव सुरवसे, कळंब तालुका अध्यक्षपदी विष्णू मंडाळे, शहराध्यक्षपदी युवराज पंडित, युवक शहराध्यक्ष प्रमोद करवलकर यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांना किशोर राऊत, लक्ष्मण माने यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. निवडीनंतर छत्रपती शिवाजी महाराज, जिवाजी महाले यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रेमचंद गोरे, सतीश गोरे, बापुराव सुरवसे, विष्णू मंडाळे, युवक तालुकाप्रमुख राजे सावंत, युवराज पंडित, दशरथ मंडाळे, राहुल इंगळे, बाळासाहेब पौळ, ओंकार मंडाळे, रणजित शेंद्रे, सचिन मंडाळे, गोकुळ मंडाळे, मुन्ना काळे, प्रमोद करवलकर, नाना करवलकर, ज्ञानेश्वर पंडित, सिद्धेश्वर डिगे, महेश काळे आदी समाजबांधव उपस्थित होते.

190821\img-20210819-wa0041.jpg

कळंब येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांना प्रदेश संघटक किशोर राऊत, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

Web Title: Elections of Maharashtra Nuclear Corporation office bearers