पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:42 IST2020-12-30T04:42:04+5:302020-12-30T04:42:04+5:30
नववर्षाचे स्वागत साधेपणाने करा उस्मानाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या स्वागतासाठी कुठल्याही धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये, अशा मार्गदर्शक ...

पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर
नववर्षाचे स्वागत साधेपणाने करा
उस्मानाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या स्वागतासाठी कुठल्याही धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये, अशा मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. या सूचनांचे जिल्ह्यातील नागरिकांनी देखील पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी कोणत्या नियमांचे पालन करावे, याबाबत राज्य शासनाने परिपत्रक जारी केले असून, कोरोना संकटात नागरिकांनी जबाबदारीने वागत आणि आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तसेच संसर्ग फैलावणे टाळण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
तेरमधील शिबिरात ५५ जणांचे रक्तदान
तेर : राजा शिवछत्रपती परिवाराच्या उस्मानाबाद आणि लातूर परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने येथे रक्तदान शबीर घेण्यात आले. यात ५५ दात्यांनी सहभाग नोंदविला. या उपक्रमासाठी आनंद घोडके, अविष्कार योगी, संदीप ढवळे, व्यंकट काकडे, अविनाश दिवटे, दत्तात्रय गायकवाड, बंडू पुजारी यांच्यासह सह्याद्री ब्लड बँक व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. राजा शिवछत्रपती परिवार हा सध्या २३ जिल्ह्यातील शिवकार्य म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्तित्त्व सांगत उभा असलेल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्य करीत आहे.
‘ओपॅक’ विषयावर ऑनलाईन कार्यशाळा
परंडा : येथील रा. गे. शिंदे महाविद्यालयात ग्रंथालयाच्या वतीने ‘ओपॅक’ या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा पार पडली. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. दीपा सावळे तर प्रमुख वक्ते म्हणून आर. एस. मुंडले, नागपूर येथील धरमपेठ आर्ट्स ॲण्ड कॉमर्स महाविद्यालयाचे डॉ. मंजू दुबे उपस्थित होत्या. यावेळी डॉ. दुबे यांनी एम ओपॅक आणि ऑपेक हे दोन सॉफ्टवेअर असून, यात आपणास जे पुस्तक हवे ते टाईप करून मिळवू शकतो, असे सांगितले. यावेळी उपस्थितांनी उपस्थित केलेल्या शंकांचे डॉ. दुबे यांनी निरसन केले.
वीज पुरवठा विस्कळीत
येरमाळा : परिसरातील शेतीचा वीज पुरवठा वारंवार विस्कळीत होत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. सध्या रबी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे. मात्र, सुरळीत वीज मिळत नसल्याने पाणी देण्यात अडचणी येत आहेत.
शेतकऱ्यांची गैरसोय
(तुरीचा फोटो)
परंडा : यंदा दमदार पावसामुळे तुरीचे उत्पादन चांगले झाले आहे. परंतु, तूर बाजारात येताच भाव उतरत असून, त्यातच तालुक्यात एकही हमीभाव केंद्र सुरू नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच अडचण होत आहे.
‘बस सुरु करा’
(फोटो)
नळदुर्ग : नववी व दहावीच्या शाळा सुरु होऊन महिन्याचा कालावधी उलटला तरीही अद्याप एसटी महामंडळाने ग्रामीण भागातील अनेक बसगाड्या सुरु केलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा परिणाम होत असल्याचे चित्र आहे.
रस्त्याची दुरवस्था
तेर : उस्मानाबाद तालुक्यातील तेर ते मुरूड मार्गावरील अहिल्यादेवी होळकर चौकात रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे याची त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
आखाडा पेटला
तुळजापूर : तालुक्यातील मंगरूळ येथे ग्रामपंचायत निवडणुका आखाडा पेटला असून, येथे ११ सदस्यांच्या निवडीसाठी निवडणूक होत आहे. या गावात चार प्रभाग असून, साडेचार हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.