खाद्यतेलाचा भडका कायम; शेवगा, गवार, कारल्याचे दर चढेच,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:30 IST2020-12-29T04:30:12+5:302020-12-29T04:30:12+5:30
मागील तीन महिन्यापासून तेलाच्या दरात वाढत होते. दिवाळी सणाच्या तोंडावर त्यात आखणी वाढ झाली. दिवाळीनंतरही खाद्यतेलाचे दर वाढतच आहेत. ...

खाद्यतेलाचा भडका कायम; शेवगा, गवार, कारल्याचे दर चढेच,
मागील तीन महिन्यापासून तेलाच्या दरात वाढत होते. दिवाळी सणाच्या तोंडावर त्यात आखणी वाढ झाली. दिवाळीनंतरही खाद्यतेलाचे दर वाढतच आहेत. सध्या पामतेल ११० रुपये किलो, सोयाबीन तेल ११५ ते १२० रुपये, शेंगदाणा तेल १४० ते १५० रुपये किलोन विक्री होत आहे. या सर्वच तेलाचे दर १५ रुपयांनी वाढले आहेत. तर दुसरीकडे पालेभाज्यांची आवक वाढू लागल्याने भाज्यांचे दर उतरले आहेत. कांदा, ४० बटाटा ३०, भेंडी ३०, दोडका ४०, पत्ताकोबी २०, फ्लाॅवर, पत्ताकोबी, टाेमॅटो २० रुपये किलोने विक्री होत आहे. शिमला मिरची, हिरवी मिरची ४० रुपये प्रतिकिलो दराने विक्री झाली. शेवगा, गवार, कारल्याची आवक कमी असल्याने याचे दर वाढले आहेत. शेवगा ८० रुपये, गवार ६० रुपये तर कारले ५० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहेत. हिवाळ्याच्या दिवसात आरोग्यासाठी फळे लाभदायक असल्याने फळांच्या खरेदीसाठी बाजारात नागरिक गर्दी करु लागले आहेत.
कोट...
पाऊण एकर क्षेत्रावर हिरवी मिरचीची लागवड केली होती. लागवडीसाठी १५ हजार खर्च झाला. पावसामुळे मिरचीचे नुकसान झाले. त्यामुळे खर्चही निघाला नाही. रामलिंग नरवडे, भाजीपाला उत्पादक
यंदा लाॅकडाऊन काळात तेलाचे दर वाढलेले आहेत. मागील तीन महिन्यापासून तेलाचे दर १० टक्क्यांनी वाढले आहेत. शेंगदाना ८८ रुपये किलो विक्री होत आहे.
अमित भराटे,किराणा व्यवसायिक
पाऊण एकर क्षेत्रावर हिरवी मिरचीची लागवड केली होती. लागवडीसाठी १५ हजार खर्च झाला. पावसामुळे मिरचीचे नुकसान झाले. त्यामुळे खर्चही निघाला नाही. रामलिंग नरवडे, भाजीपाला उत्पादक
चौकटी...
बाजारात मागणीच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक वाढली आहे. मेथी, पालक, चूका ५ रुपये जुडी प्रमाणे विक्री होत आहे. कोंथीबीर १० रुपयास दोन ते तीन जुड्या विक्री केल्या जात आहेत. लिंबाचे दरही उतरले असून, १० रुपयास १५ नग लिंबू विक्री झाले.
भाज्यांचे दर उतरले असल्याने डाळींचे दर सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. हरभरा डाळ ५६, तूर डाळ ८८, मूसर डाळ ६३, उडीद डाळ ९० रुपये, मूग डाळ ९० रुपये किलोने विक्री होत आहे. शेंगदाणा ८८ रुपये, साखर ३२ रुपये प्रतिकिलो दराने विक्रीस उपलब्ध असल्याची माहिती विक्रेत्यांनी सांगितली.
बाजारात फळांची आवक वाढू लागली आहे. डाळींब १४० ते १६० रुपये किलो, सफरचंद १०० ते १४० रुपये, संत्रा ५० ते ८० रुपये, चिकू ६० रुपये तर पेरु ३० ते ५० रुपये किलोने विक्री होत आहेत.