उस्मानाबाद : लॉकडाऊन निर्बंध आता शासनाने शिथिल केले आहेत. मात्र, तरीही कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध घातले आहेत. त्यानुसार आता रेल्वे, हवाई प्रवास करण्यासाठी तसेच मॉलमध्ये प्रवेशासाठी कोरोना लसचे दोन्ही डोस घेतल्याचा युनिव्हर्सल ट्रॅव्हल ई- पास सादर करावा लागणार आहे.
कोरोना काळात सर्वच व्यवहारांवर निर्बंध आले होते. आता कोरोना संसर्गामध्ये कमालीची घट झाल्याने सरकारने बहुतांश व्यवहार सुरु केले आहेत. नागरिकांना प्रवास करता यावा. यासाठी युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासची सोय केली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रवासात कोणतीच अडचण येणार नाही. या पासच्या माध्यमातून रेल्वे, हवाई प्रवास तसेच अगदी शोपिंग मॉलमध्ये सहज प्रवेश मिळणार आहे. ही वेबलिंक सर्वच ब्राउझर्सवर उघडू शकणार आहे. नागरिकांनी या वेबलिंकरुन ई-पास डाऊनलोड करुन आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे.
जिल्ह्यात दोन्ही डोस घेतले किती?
फ्रंट लाईन वर्कर्स - १५९१९
आरोग्य कर्मचारी - ७७८९
१८ ते ४४वयोगट - १५१८६
४५ ते ५९ -४५५९६
६० पेक्षा जास्त वयाचे - ५८४६२
दोन्ही डोस घेतलेल्यांचे प्रमाण (टकक्यांत) - ११.३५
असा मिळवा ई-पास
१. पात्र नागरिकांनी https://epassmsdma.mahait.org ही वेब लिंक उघडावी.
२. त्यातील ‘ट्रॅव्हल पास फॉर व्हॅक्सिनेटेड सिटिझन्स’ यावर क्लिक करा.
३. त्यानंतर आपला कोविड लसीकरणासाठी नोंदविलेला मोबाइल क्रमांक नमूद करावा. लगेचच मोबाइलवर ओटीपी अर्थात एकवेळ वापरासाठीचा पासवर्ड लघुसंदेश (एसएमएस) द्वारे प्राप्त होईल.
४. हा ओटीपी नमूद केल्यानंतर लाभधारकाचे नाव, मोबाईल क्रमांक, लाभधारकाचा संदर्भ क्रमांक इत्यादी तपशील आपोआप समोर दिसतील.
५. त्यामध्ये ‘पास निर्माण करा’ (जनरेट पास) या पर्यायावर क्लिक करावे.
६. त्यावर क्लिक करताच अर्जदाराचा तपशील तसेच कोविड लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्याची दिनांक इत्यादी सर्व तपशील आपोआप दिसेल.
७. या तपशीलमध्ये ‘सेल्फ इमेज’ या पर्यायामध्ये अर्जदाराने स्वतःचे छायाचित्र अपलोड करावे. ते मोबाईल गॅलरीतून अपलोड करता येऊ शकते किंवा मोबाईल कॅमेराद्वारे जागीच छायाचित्र (सेल्फी) काढूनदेखील अपलोड करता येईल.
८. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील २४ तासांमध्ये युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासकरिता लघुसंदेश (एसएमएस)द्वारे लिंक प्राप्त होईल.
- लिंक प्राप्त झाल्यानंतर ई-पास मोबाइलमध्ये जतन (सेव्ह) करून ठेवावा.
३) उपजिल्हाधिकाऱ्यांचा कोट