शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कर्नाटकातील इंधन स्वस्ताई, राज्यातील सीमावर्ती भागातील पंपांना टाळे लागण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 12:15 IST

इंधन विक्री ४ लाखावरून ३० हजार लिटरपर्यंत आली खाली आली आहे

- गुणवंत जाधवरउमरगा (जि. उस्मानाबाद) : कर्नाटक राज्यात महाराष्ट्रापेक्षा इंधन स्वस्त आहे. प्रतिलिटर आठ ते नऊ रुपयांची दरात तफावत आहे. उमरग्यासह परिसरातील वाहनधारक इंधनासाठी कर्नाटकचा रस्ता धरीत आहेत. त्यामुळे पूर्वी उरग्यासह परिसरात प्रतिदिन ४ लाख लिटर विक्री होणारे डिझेल आता ३० हजार लिटरपर्यंत खाली आले आहे, हे विशेष. परिणामी राज्यातील सीमावर्ती भागातील अनेक पेट्राेलपंपांना टाळे लावण्याची नामुष्की ओढावली आहे.

उमरगा तालुका हा महाराष्ट्र-कर्नाटक राज्याचा सीमावर्ती भागात आहे. या सीमावर्ती भागातील वाहने आणि शेतकरी कर्नाटकात जाऊन बसवकल्याण, आळंद तालुक्यातील पंपावर इंधन भरत आहेत. तसेच मुंबई-हैद्राबाद महामार्गावरील व गुलबर्गा-लातूर मार्गावरील वाहने कर्नाटक राज्यातील बाॅर्डरवरील पंपावर वाहनाची टाकी फुल्ल करतात. कारण कर्नाटक राज्यात महाराष्ट्रापेक्षा इंधन स्वस्त आहे. पेट्राेलच्या दरामध्ये ९ रुपये, तर डिझेलचा दर ८ रुपयांनी कमी आहे. या इंधन स्वस्ताईचा फटका आता सीमावर्ती भागातील राज्यातील पेट्राेल पंपचालकांना बसू लागला आहे. इंधन विक्री जवळपास ठप्प झाली आहे. पूर्वी सर्व पेट्राेल पंपांवरून मिळून साधारपणे ४ लाख लिटर इंधन विक्री हाेत हाेते. आता हे प्रमाण अवघ्या ३० हजार लिटरपर्यंत खाली आले आहे.

तस्करीतून पैसे मिळवण्याचा धंदा फोफावला...कर्नाटकातून स्वस्त पेट्रोल-डिझेल आणायचे आणि महाराष्ट्रात विकायचे, असा नवाच धंदा यानिमित्ताने सीमावर्ती भागात फोफावला आहे. लिटरमागे आठ-नऊ रुपये मिळाले, तरी दिवसभराचा खर्च निघेल इतकी विक्री होते. सध्या असे प्रकार जोमात सुरू आहेत.

अशी आहे कर्नाटकातील स्वस्ताई...उमरगामध्ये बसवकल्यानमध्येपेट्रोल            पेट्रोल१२०.९२ १११.८८महाराष्ट्रापेक्षा ९.०४ रुपयांनी स्वस्तडिझेल             डिझेल१०३.६१            ९५.५२

महाराष्ट्रापेक्षा ८.०९ रुपयांनी स्वस्त.कर्नाटकात इंधन स्वस्त असल्याने तेथून तस्करी करून महाराष्ट्रात आणले जात आहे. तेथील स्वस्ताईमुळे महाराष्ट्रातील सीमेवरील पंप बंद पडले आहेत. दररोजचा उमरगा तालुक्यातील ४ लाख लिटरचा खप अवघ्या ३० हजार लिटरवर आला आहे. यावर तोडगा काढण्याची विनंती संघटनेने राज्य सरकारला वेळोवेळी केली आहे.- रझाक अत्तार, अध्यक्ष, उमरगा तालुका पेट्रोल पंप संघटना

टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढOsmanabadउस्मानाबादKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्र