शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

फटाका कारखान्याच्या भीषण स्फोटात मालकाचा जागीच मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 14:19 IST

एक कामगार महिला गंभीर जखमी

कळंब (जि. उस्मानाबाद) : शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका फटाका कारखान्यात भीषण स्फोट झाला. यात कारखाना मालकाचा जागीच मृत्यू झाला असून, एक महिला गंभीर भाजली आहे. तिला पुढील उपचारार्थ अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कळंब शहरापासून अर्धा किमी अंतरावर लातूर कळंब-भाटसांगवी राज्यमार्गावर फेरोज फायर वर्क्स हा फटक्याचा कारखाना आहे. कळंब महसूल हद्दीतील अय्युब युनूस आत्तार यांच्या मालकीच्या सर्व्हे क्रमांक १३८ मधील एक हेक्टर क्षेत्रामध्ये हा कारखाना उभारण्यात आला आहे. संबंधित विभागाकडून रितसर परवाना घेवून चालवण्यात येणाऱ्या या फटका कारखान्यात विविध फटाक्यांची निर्मिती केली जात होती. यासाठी सदर क्षेत्रात पाच पक्के बांधकाम केलेल्या खोल्या व काही पत्र्याचे शेड होते.

यामध्ये रविवारी मालक व काही महिला कामगार फटाका बनवण्याचे काम करत होत्या. याच दरम्यान दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एका खोलीमध्ये अचानक स्फोट झाला. या दुर्घटनेत फटाका कारखान्याचे मालक फेरोज अय्युब आत्तार (३८ रा. जिजाऊ नगर, कळंब) यांचा जागीच मृत्यू झाला. तर याठिकाणी कार्यरत असलेल्या सलमा रज्जाक शेख (३५ रा. इंदिरानगर) या गंभीररीत्या भाजल्या आहेत. त्यांना कळंब येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. नंतर पुढील उपचारार्थ अंबाजोगाई येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले.

आणि ते बचावले...कारखान्यात वीस पेक्षा जास्त कामगार कामाला असल्याचे समजते. परंतु, रविवारी यातील अनेक कामगार उष्णता व लग्नसराई यामुळे कामावर हजर नव्हते. त्यामुळे ते बचावले. तसेच घटनेपासून काही अंतरावर काही  महिला काम करत होत्या. स्फोटानंतर त्यांनी पळ काढला.

आपत्कालीन यंत्रणा धावलीच नाही...घटनास्थळी सर्वात प्रथम कळंब येथील सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. मनोज चोंदे हे पोहोचले. त्यांनी अग्निशामक यंत्रणा, ग्रामीण रूग्णालय व १०८ आरोग्य सेवेला संपर्क केला. परंतु, नगर परिषदेची अग्निशमन दलाची गाडीच नसल्याचे समोर आले; तर ग्रामीण रूग्णालयाची ना यंत्रणा आली ना रुग्णवाहिका. अशीच अवस्था आपतकालीन आरोग्य सेवेच्या १०८ रुग्णवाहिकेची झाली. यामुळे जखमीला उशिरा मदत मिळाली.

घटनास्थळाची अधिकाऱ्यांकडून पाहणी... कळंब येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, तहसीलदार मंजूषा लटपटे, नायब तहसीलदार अस्लम जमादार, तलाठी एस. एस. बिक्कड आदींनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कळंब पोलीस दुर्घटनेची कसून चौकशी व पाहणी करत होते.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघातfire crackerफटाकेOsmanabadउस्मानाबाद