वाहन निष्काळजीपणे चालविले, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:44 IST2021-02-27T04:44:28+5:302021-02-27T04:44:28+5:30

उस्मानाबाद - तालुक्यातील येडशी येथील समाधान चव्हाण यांनी बसस्थानक चाैकात आपल्या ताब्यातील दुचाकी निष्काळजीपणे व हयगईने चालवून कायद्याचे उल्लंघन ...

Driving recklessly, filing a crime | वाहन निष्काळजीपणे चालविले, गुन्हा दाखल

वाहन निष्काळजीपणे चालविले, गुन्हा दाखल

उस्मानाबाद - तालुक्यातील येडशी येथील समाधान चव्हाण यांनी बसस्थानक चाैकात आपल्या ताब्यातील दुचाकी निष्काळजीपणे व हयगईने चालवून कायद्याचे उल्लंघन केले. या प्रकरणी संबंधिताविरूद्ध उस्मानाबाद ग्रामीण पाेलीस ठाण्यात भादंसंचे कलम २७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

जुगार अड्ड्यावर छापा, राेख रक्कम जप्त

उस्मानाबाद - तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा गावातील एका दुकानासमाेर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर तुळजापूर पाेलिसांनी छापा मारला. या कारवाईत जुगाराच्या साहित्यासह १ हजार ५८० रूपये जप्त केले. याप्रकरणी उमेश खांडेकर याच्याविरूद्ध तुळजापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

काठीने मारून केले जखमी

उस्मानाबाद - वाशी तालुक्यातील पारा येथील पारधी पिढी येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून पिंटू शिंदे, मुरली शिंदे, बबलू शिंदे, सुनिल शिंदे, साेनू पवार यांनी २५ फेब्रुवारी राेजी सुनिल शिंदे (रा. जामखेड) यांना काठीने मारहाण केली. याप्रकरणी वाशी पाेलीस ठाण्यात संबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याच घटनेत कैलास पवार यांच्या फिर्यादीवरून सुनिल शिंदे यांच्याविरूद्ध गुन्हा नाेंद झाला.

Web Title: Driving recklessly, filing a crime