डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामासाठी स्वाक्षरी माेहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:23 IST2021-06-26T04:23:20+5:302021-06-26T04:23:20+5:30

फुले, शाहू, आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था ही मागील पाच वर्षांपासून कसबे तडवळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम सुरू ...

Dr. Signature campaign for Babasaheb Ambedkar Memorial work | डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामासाठी स्वाक्षरी माेहीम

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामासाठी स्वाक्षरी माेहीम

फुले, शाहू, आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था ही मागील पाच वर्षांपासून कसबे तडवळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम सुरू करावे, यासाठी पाठपुरावा करत आहे. परंतु, जिल्हा प्रशासन स्मारकाच्या कामास टाळाटाळ करीत आहे. दरम्यान, प्रशासनाच्या या भूमिकेविराेधात आता शनिवारपासून कसबे तडवळे येथे जिल्हा प्रशासनाच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. निवेदनावर चंदू भालेराव, जयशील भालेराव, प्रशांत सोनवणे, विजय बनसोडे, बाबासाहेब कांबळे, कैलास शिंदे, सुनील माळाळे, अक्षय बनसोडे, अतुल लष्करे, पृथ्वीराज चिलवंत, समाधान सरवदे, श्रीकांत गायकवाड, राहुल भालेराव, हेमंत निकाळजे, अनुप सोनवणे, दुशांत सोनवणे, सिद्धार्थ निकाळजे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

चाैकट..

जिल्हा परिषद शाळेचे स्थलांतर तातडीने करून त्या ठिकाणी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम सुरू करावे. या मागणीसाठी आम्ही मागील पाच वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. परंतु, जिल्हा प्रशासन हलगर्जीपणा करीत आहे. साेबतच स्थानिक राजकीय नेतेही उदासीन आहेत. त्यामुळे स्वाक्षरी माेहीम हाती घेण्यात आली आहे. ही बाब प्रशासनाने गांभीर्याने घेऊन काम हाती घ्यावे, अन्यथा तीव्र आंदाेलन करू.

-जयशील भालेराव, कसबे तडवळे.

Web Title: Dr. Signature campaign for Babasaheb Ambedkar Memorial work