यावेळी उपसरपंच कॉ. पंकज चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ आखाडे, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कुंडलिक आखाडे, विकास तळेकर, डी. बी. मोटे, नितीन माने, भारत गायकवाड, मनोज औताने, आर. ए. डोके आदी उपस्थित होते. यावेळी भारत गायकवाड यांनी सामूहीक बुद्ध वंदना घेतली.
सार्वजनिक वाचनालय सुरू
पारगाव : येथील पंचशील नगर येथे सार्वजनिक वाचनालय सुरू करून डॉ. आबेडकर जयंती साजरी करण्यात आली. शिवसेनेचे तालुका उपप्रमुख विकास तळेकर, सरपंच महेश कोळी, उपसरपंच कॉ. पंकज चव्हाण यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी विकास तळेकर याच्या हस्ते बोधीवृक्षाचे पूजन करण्यात आले. उपसरपंच कॉ. पंकज चव्हाण यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. सरपंच महेश कोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. कार्यक्रमाला कुंडलिक आखाडे, नवनाथ आखाडे, जितेंद्र औताने, डी. बी. मोटे, रामहरी मोटे, भारत गायकवाड, बप्पा शेंडगे, नितीन माने, दयानंद गायकवाड, संभाजी चव्हाण, सुजित औताने, राहुल शिंदे, विशाल गायकवाड, सौरभ गायकवाड आदी उपस्थित होते.